'सिंड्रेला', 'शँग-ची', 'ब्लॅकविडो' चित्रपटांची मिळणार प्रेक्षकांना मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 09:37 PM2021-09-02T21:37:15+5:302021-09-02T21:37:53+5:30

येत्या वीकेंडला ५ नव्या ऑफर्स प्रदर्शित होणार आहेत.

Cinderella, Shang-chi, Blackwido movies will entertain the audience | 'सिंड्रेला', 'शँग-ची', 'ब्लॅकविडो' चित्रपटांची मिळणार प्रेक्षकांना मेजवानी

'सिंड्रेला', 'शँग-ची', 'ब्लॅकविडो' चित्रपटांची मिळणार प्रेक्षकांना मेजवानी

Next

जागतिक चित्रपट असो वा मालिका असो, ज्यांना सलग बघायला आवडते त्यांच्यासाठी येत्या वीकेंडला मेजवानी असणार आहे. या वीकेंडला ५ नव्या ऑफर्स प्रदर्शित होणार आहेत. ही बहुप्रतीक्षित नावे आहेत अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचे सिंड्रेला,मार्व्हलचे शँग ची अँड दि लेजंड्स ऑफ टेन रिंग्ज, ब्लॅक विडो, फास्ट अँड फ्यूरियस ९ आणि मनी हाईस्टचा सीझन ५. 

मार्व्ह्लचा पहिला संपूर्ण आशियाई सुपरहिरो चित्रपट शँग ची अँड दि लेजंड्स ऑफ टेन रिंग्ज हा चित्रपट तुम्हाला पुन्हा एकदा चित्रपटगृहाकडे वळायला भाग पाडतात. सिमु लिऊ, औकाफिना मेंझर झांग,फला चेन, बेनेडिग्ट वोंग यांच्यासह मायकेल येओह आणि टोनी लॉइंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट इंग्रजी, हिंदी. तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होईल. शँगची ३ सप्टेंबर २०२१ पासून चित्रपटगृहात पहा.

फास्ट अँड फ्यूरियस या मालिकेचा ९वा भाग देखील अखेर इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. विन डिझेल आणि मायकेल रोड्रिग्ज यांच्यासोबत जॉन सेना, कार्डी बी आणि चार्लीज थेरोन यांच्यासह इतर कलाकारांनी भरलेला फास्ट अँड फ्यूरियस ९ हा चित्रपट २ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.
आधुनिक परीकथा सांगणाऱ्या अॅमेझॉन प्राईमच्या सिंड्रेला ओरिजिनल चित्रपटामध्ये कॅमिला कार्बेलो हिची मुख्य भूमिका आहे. आजच्या काळातल्या ध्येयवेड्या,धाडसी आणि स्वत:ला महत्व देणार्या सिंड्रेलाला चौकटी मोडून स्वत:चे आयुष्य स्वत:च्या नियमांनुसार जगायचे आहे.

के कॅनन यांचे दिग्दर्शन असलेल्या अमेझोन प्राईमवरील सिंड्रेला या चित्रपटात कॅमिला, इडिना मेंझेल,मिनी ड्रायव्हर, निकोलास गॅलिझिन यांच्यासह बिली पोर्टर आणि पिअर्स ब्रोसनान यांच्या भूमिका आहेत. आतंरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित झाल्यानंतर स्कार्लेट जॉन्सन यांची भूमिका असलेला ब्लॅक विडो हा चित्रपट आता भारतातही प्रदर्शित होऊ घातला आहे.

आतंरराष्ट्रीय पातळीवर धुमाकुळ घातल्यानंतर हा उत्कृष्ट चित्रपट आता भारतातही डिझने + हॉटस्टारवर ३ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. ५ व्या सीझनच्या पहिल्या टप्प्यातील ५ भाग ३ सप्टेंबरला प्रदर्शित होतील आणि याचा दुसरा भाग ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल. हा ५ वा सीझन नेटफ्लिक्सवर पहायला मिळेल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cinderella, Shang-chi, Blackwido movies will entertain the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app