Christopher Dennis Aka The Hollywood Superman Dies At 52 | दरीत मृतावस्थेत सापडला हॉलिवूडचा सुपरमॅन, काही दिवसांपासून होता बेघर
दरीत मृतावस्थेत सापडला हॉलिवूडचा सुपरमॅन, काही दिवसांपासून होता बेघर

हॉलिवूडचा सुपरमॅन क्रिस्टोफर डेनिसचं निधन झालं आहे. तो ५२ वर्षांचा होता. डेनिस शनिवारी सैन फर्नांडो दरीमध्ये मृतावस्थेत सापडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याचे शरीर कपडे दान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बिनमध्ये पडलेलं दिसलं. 


अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, तपास करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार क्रिस्टोफर काही दिवसांपासून बेघर होता. ज्यावेळी त्याचे निधन झाले त्यावेळी कदाचित तो कपडे गोळा करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यासोबत कोणती हिंसा झाल्याचे वृत्त समोर आले नाही.


डेनिस हॉलिवूडमध्ये सुपरमॅन म्हणून प्रचलित आहे. त्याच्या निधनानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत आणि त्याच्या आत्म्यास शांती मिळो म्हणून प्रार्थना करत आहेत. 


डेनिसच्या जीवनात बरेच चढउतार आले होते. एकेकाळी स्टार असणाऱ्या डेनिसला गेल्या काही दिवसांपासून बिकट परिस्थितीचा सामना करत होता. इतकंच नाही तर त्याच्याकडे राहण्यासाठी घर देखील नव्हते.


Web Title: Christopher Dennis Aka The Hollywood Superman Dies At 52
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.