Chelsea Handler Leaves The Internet In Splits As She Turns Her Bra Into A Face Mask TJL | CoronaVirus: या प्रसिद्ध अभिनेत्रीनं लढवली वेगळी शक्कल, चक्क 'ब्रा'पासून बनवला मास्क, पहा व्हिडिओ

CoronaVirus: या प्रसिद्ध अभिनेत्रीनं लढवली वेगळी शक्कल, चक्क 'ब्रा'पासून बनवला मास्क, पहा व्हिडिओ

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. आतापर्यंत कित्येक लोकांचे बळी गेले आहे. हा संसर्गजन्य व्हायरस असल्यामुळे तोंडावर मास्क लावल्याशिवाय बाहेर पडायचे नाही आणि ग्रुपने रहायचे नाही. सोशल डिस्टेन्समध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात लोक चेहऱ्यावर मास्क लावून वावरताना दिसत आहेत. त्यात आता अमेरिकन कॉमेडियन चेल्सी हॅण्डलरने तिच्याच ब्रापासून मास्क तयार केला आहे. फीमेल फर्स्ट डॉट को डॉट युकेच्या रिपोर्टनुसार, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने आपल्या चाहत्यांना कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान क्रिएटीव राहण्यासाठी अपील केले आहे. यासोबतच तिने व्हिडिओ शेअर करून ब्रापासून मास्क कसं तयार करावा हे सांगितले आहे.


चेल्सीनं तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती ब्रापासून मास्क कसं तयार करायचं हे सांगताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना चेल्सी म्हणते, 'शॉर्ट सप्लायमध्ये तयार करण्यात आलेलं मास्क. आपल्याला आता प्रकरण आपल्या हातात घ्यावं लागेल. पुरुषांनाही.' व्हिडीओत दिसत आहे की, चेल्सी एका ब्राला मास्कमध्ये रुपांतर करत चेहऱ्यावर लावत आहे. 


चेल्सीचा हा ब्रापासून मास्क तयार केल्यााच व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियाही दिल्या आहेत.अमेरिकेत अजूनही कोरोनाचा कहर सुरूच आहे. अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी 2000 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 14695 लोक दगावले आहेत. बुधवारी 1973 आणि मंगळवारी 1939 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Chelsea Handler Leaves The Internet In Splits As She Turns Her Bra Into A Face Mask TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.