brad pitt jennifer aniston affair sag awards 2020 video viral | OMG! घटस्फोटाच्या 14 वर्षांनंतर पुन्हा पहिला पत्नीच्या प्रेमात पडला हा सुपरस्टार

OMG! घटस्फोटाच्या 14 वर्षांनंतर पुन्हा पहिला पत्नीच्या प्रेमात पडला हा सुपरस्टार

ठळक मुद्दे ब्रॅड पिट व जेनिफर यांनी 2000 मध्ये लग्न केले होते.

फिल्म इंडस्ट्रीत नाती बनताना आणि बिघडताना वेळ लागत नाही. कॅमे-याच्या झगमगाटात स्टार्सच्या नात्यांतील बदल सहज टीपता येत नाहीत. पण म्हणून ते लपूनही राहत नाहीत. हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता ब्रॅड पिट याच्याबद्दल नेमके असेच घडतेय.
होय, अँजेलिना जोलीसोबत घटस्फोट झाल्यानंतर ब्रॅड पिट सिंगल होता. पण आता कदाचित तसे नाही. होय, ब्रॅड पिट आणि त्याची पहिली पत्नी जेनिफर एनिस्टन पुन्हा एकत्र दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु आहे.
नुकतेच Screen Actors Guild Award सोहळ्यात जे काही दिसले, त्यावरून या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. या सोहळ्यात ब्रॅडला त्याच्या चित्रपटासाठी आणि जेनिफरला तिच्या शोसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ब्रॅड पिट पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर गेला तेव्हा जेनिफरच्या चेह-यावर आनंद बघण्यासारखा होता. दुसरीकडे जेनिफर पुरस्कार स्वीकारत असताना ब्रॅड पिट आनंदाश्रू गाळत होता. जेनिफरला अवार्ड मिळाला तेव्हा ब्रॅड बॅकस्टेज होता आणि मॉनिटरवर जेनला पाहून त्याच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. यानंतर बॅकस्टेजवर दोघेही एकमेकांना भेटले. पापाराझींनी या दोघांचे एकत्र फोटोही घेतले. या फोटोत ब्रॅडने जेनिफरचा हात पकडलेला दिसतोय.
ओके मॅगझिनने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रॅडने आपल्या मुलांची व जेनिफरची भेट घालून दिलीय. मुलांनाही जेनिफर आवडल्याचे  कळतेय.
तुम्हाला ठाऊक असेलच की, ब्रॅड पिट व जेनिफर यांनी 2000 मध्ये लग्न केले होते. 2005 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. यानंतर ब्रॅड अँजेलिनाच्या प्रेमात पडला होता. 2014 मध्ये ब्रॅडने अँजेलिना जोलीसोबत लग्न केले. मात्र 2016 मध्ये दोघेही विभक्त झालेत. 

Web Title: brad pitt jennifer aniston affair sag awards 2020 video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.