हॉलिवूड अभिनेत्री  अँजेलिना जोलीला जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते. अँजेलिनाने लुकिंग टू गेट आऊट सिनेमातून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार अँजेलिनाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ती एक वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.

यानंतर तिच्या आईने तिला आणि भावाला मोठं केलं.  रिपोर्टनुसार अँजेलिनाने सुरुवातीला अभिनयात रस नव्हता. मात्र जसजशी ती मोठी होऊ लागली, आईसोबत जाऊन सिनेमा पाहू लागला. तसा तिचा अभिनयातला इंटरेस्ट वाढू लागला. अँजेलिनाने तीन लग्न केली. त्यानंतर ही ती एकाकी आयुष्य जगत आहे.  


अँजेलिनाने पहिलं लग्न 28 मार्च 1996 साली जॉनी ली मिलरसोबत केले. मात्र 3 फेब्रुवारी 1999 साली दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने अमेरिकन अभिनेता बिली बॉब थार्नटनसोबत दुसरं लग्न केले मात्र 2003 मध्ये हेही नातं संपुष्टात आलं. ब्रॅड पिटसोबत ती नात्यात होती मात्र तिचं हे नातं ही फार काळ टिकलं नाही.

अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये विवाह केला आणि २०१६मध्ये हे दोघे विभक्त झाले. . ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत.

Web Title: Angelina jolie single after 3 marriages know more secrets about her life nodal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.