वाढदिवसाचा केक कापायला गेली अन् केसांना आग लागली, हॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 03:44 PM2021-09-23T15:44:41+5:302021-09-23T15:45:28+5:30

होय, बर्थ डे सेलिब्रेशन अगदी जीवावर बेतणार होतं. पण नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावलं. 

Actress And Tv Personality Nicole Richie Hair Caught Fire As She Cut Her 40th Birthday Cake Video Viral | वाढदिवसाचा केक कापायला गेली अन् केसांना आग लागली, हॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

वाढदिवसाचा केक कापायला गेली अन् केसांना आग लागली, हॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

Next
ठळक मुद्देनिकोल रिची ही हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘द सिंपल लाईफ’ या टीव्ही सीरिजमुळे ती प्रकाशझोतात आली.

हॉलिवूड (Hollywood) अभिनेत्री निकोल रिची (Nicole Richie)अगदी थोडक्यात बचावली. होय, बर्थ डे सेलिब्रेशन अगदी जीवावर बेतणार होतं. पण नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावलं. 
नुकताच निकोलनं तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाची जंगी पार्टी रंगली होती. मित्रमंडळी सगळेच जमले होते. वाढदिवसाचा केक अगदी तयार होता. अशात काळ्या रंगाचा ड्रेस, मोकळे केस अशा स्टाईलिश अंदाजात निकोलची एन्ट्री झाली. मग सुरू झालं सेलिब्रेशन. केकवरच्या जळत्या कँडल्स निकोलच्या प्रतीक्षेत होत्या. निकोल त्या विझवायला खाली वाकली आणि... ? आणि अचानक तिच्या मोकळ्या केसांनी पेट घेतला. क्षणभर सगळेच घाबरलेत. मित्रांनी लगेच केसांना लागलेली आग विझवली आणि संकट टळलं.

निकोलने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. काहीजण हा व्हिडीओ पाहून हसत आहेत तर काहींनी निकोल सुरक्षित आहे, हे पाहून देवाचे आभार मानले आहेत.

निकोल रिची ही हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘द सिंपल लाईफ’ या टीव्ही सीरिजमुळे ती प्रकाशझोतात आली. यानंतर तिने अनेक इंटरनॅशनल रिअ‍ॅलिटी शो जज केलेत. वर्कफ्रंटसोबतच, पॅरिस हिल्टनसोबतच्या मतभेदांमुळेही ती चर्चेत आली होती. पॅरीस ही निकोलची जवळची मैत्रिण. पण 2005 मध्ये दोघींनीही एकमेकींशी अबोला धरल्याची बातमी आली होती. अर्थात वर्षभरात दोघींचेही मतभेद दूर होऊन दोघी पुन्हा मैत्रिण झाल्या होत्या.
निकोल रिचीने 2006 साली सिंगर Joel Madden सोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

Web Title: Actress And Tv Personality Nicole Richie Hair Caught Fire As She Cut Her 40th Birthday Cake Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app