Ganesh Utsav Special Recipe : नैवेद्यासाठी गोड गोड खोबऱ्याचे लाडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 16:39 IST2019-09-11T16:38:14+5:302019-09-11T16:39:32+5:30
तुम्ही बप्पाच्या नैवेद्यासाठी खास रेसिपीच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एक मस्त रेसिपी सांगणार आहोत. बाप्पाला फक्त मोदकांचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा इतरही वेगळे पदार्थ तुम्ही तयार करू शकता.

Ganesh Utsav Special Recipe : नैवेद्यासाठी गोड गोड खोबऱ्याचे लाडू
तुम्ही बप्पाच्या नैवेद्यासाठी खास रेसिपीच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एक मस्त रेसिपी सांगणार आहोत. बाप्पाला फक्त मोदकांचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा इतरही वेगळे पदार्थ तुम्ही तयार करू शकता. बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही खोबऱ्याचे लाडू तयार करू शकता.
करायला सोपे आणि खाण्यास चविष्ट असे खोबऱ्याचे लाडू बाप्पाला नक्की आवडतील... पाहा लाडू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती
खोबऱ्याचे लाडू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- खोबरं
- खोबऱ्याचं पीठ
- साखर
- क्रिम मिल्क
- हेव्ही क्रिम
कृती :
- सर्वात आधी एक नॉन स्टिक पॅन मध्यम आचेवर ठेवा. त्यामध्ये दूध उकळा, त्यानंतर खोबरं, खोबऱ्याचं पीठ, हेव्ही क्रिम आणि साखर एकत्र करा. मिश्रण उकळी येइपर्यंत शिजवून घ्या. मिश्रण मंद आचेवर तोपर्यंत शिजवून घ्या जोपर्यंत ते व्यवस्थित आटून घट्ट होत नाही.
- घट्ट झाल्यानंतर थोडा वेळ गॅसवर शिजवून घ्या. जेव्हा दूध पूर्णपणे शिजून एक सॉफ्ट गोळा होइल. त्यानंतर गॅस बंद करा.
- मिश्रण थंड करून एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यानंतर मिश्रणाचे लाडू वळून घ्या आणि किसलेल्या खोबऱ्यामध्ये घोळून घ्या.
- बाप्पाच्या नैवेद्यासाठी खोबऱ्याचे लाडू तयार आहेत.