युवराजचा भाऊ करायचा नाही आकांक्षा पूर्ती

By Admin | Updated: November 3, 2016 10:52 IST2016-11-03T10:37:15+5:302016-11-03T10:52:11+5:30

झोरावर सिंगची पत्नी आकांक्षा शर्माने आपले लग्न मोडण्यासाठी सासूबाई शबनम सिंग यांना जबाबदार धरले आहे.

Yuvraj's brother did not want Akanksha Purty | युवराजचा भाऊ करायचा नाही आकांक्षा पूर्ती

युवराजचा भाऊ करायचा नाही आकांक्षा पूर्ती

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ३ - झोरावर सिंगची पत्नी आकांक्षा शर्माने आपले लग्न मोडण्यासाठी  सासूबाई शबनम सिंग यांना जबाबदार धरले आहे. झोरावर प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगचा भाऊ आहे. बिगबॉसच्या घरातून नुकत्यात बाहेर पडलेल्या आकांक्षाची स्पॉटबॉय कॉमने मुलाखत घेतली. या मुलाखतीत आकांक्षाने आपल्या वैवाहीक आयुष्याबद्दल अनेक गौफ्यस्फोट केले आहेत. 
 
झोरावर आणि माझा विवाह न टिकण्याला सासूबाई शबनम सिंग जबाबदार असल्याचा आरोप तिने  केला आहे. झोरावर आणि माझा विवाह सफल होऊ शकला नाही. आमच्या विवाह ख-या अर्थाने पूर्णत्वास गेला असता तर माझ्या पदरी आज एक मूल असते. झोरावर आणि मी शारीरीक आणि मानसिक दृष्टया कधीही एकत्र येऊ शकलो नाही. आम्ही दोघे जेव्हा एकत्र बाहेर जायचो. तेव्हा सासूबाई नेहमी आमच्यासोबत असायच्या. हात पकडा, किस करा अशा त्या सूचना करायच्या. सांगून अशा गोष्टी होतात का ? हे नैसर्गिकपणे घडून आले पाहिजे असे आकांक्षाने सांगितले. 
 
आमची सेक्सलाईफही खूप निराशाजनक होती असे आकांक्षाने सांगितले. त्याने माझ्यावर प्रेम केले पाहिजे. मला जवळ घेतले पाहिजे. 'चल आपण सेक्स करु' असे मी सांगू शकत नाही. आम्ही एकाच बिछान्यावर दोघे झोपायचो पण आमच्यामध्ये उशी असायची. झोरावर खूप वाईट पद्धतीने घोरते त्यामुळे मी माझी झोपण्याची जागा बदलली असे आकांक्षाने सांगितले. 
 
दोन लोकांमध्ये आकर्षण असेल तर त्यांच्यात शरीरसंबंध घडून येतात. माझ्या सासूबाई झोरावर बरोबर सेक्स करण्यासाठी मला जबरदस्ती करायच्या असे आकांक्षाने सांगितले. २७ फेब्रुवारी २०१४ रोजी घरच्यां लोकांच्या संमतीने आकांक्षा आणि झोरावरचा विवाह झाला पण हे लग्न फक्त चारच महिने टिकले. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर आकांक्षा चर्चेत आली. तिला आता चित्रपटामध्ये करीयर करण्याची इच्छा आहे. 
 
 
 

Web Title: Yuvraj's brother did not want Akanksha Purty