'जीजाजी छत पर हैं' मालिकेत पंचम सोडणार का नोकरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 11:33 IST2018-07-19T11:30:15+5:302018-07-19T11:33:26+5:30
इलायची पंचमचा उपहास करताना आणि त्याचा आत्मसन्मान दुखावताना दिसणार आहे.

'जीजाजी छत पर हैं' मालिकेत पंचम सोडणार का नोकरी?
सोनी सबवरील 'जीजाजी छत पर हैं' या विनोदी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेने कथेतील मजेशीर वळणे व आकर्षक
सादरीकरणासह प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.
'जीजाजी छत पर हैं' या मालिकेत इलायची पंचमचा उपहास करताना आणि त्याचा आत्मसन्मान दुखावताना दिसून येईल. त्यामुळे काही अशा घटना घडतील, ज्याविषयी कुणी कधी विचार देखील केला नसेल. इलायची (हिबा नवाब) पुन्हा-पुन्हा पंचम (निखिल खुराना)ला हे सांगून सतावते की, त्याच्यामध्ये जरा देखील आत्मसन्मान असेल तर त्याने घर सोडून निघून जावे. हे ऐकून पंचमचा स्वत:वरचा ताबा सुटतो आणि रागात तो घर सोडून जाण्याचा निर्णय घेतो. मात्र, पिंटू (हरवीर सिंग) त्याला असे करण्यापासून थांबवतो. पंचम मुरारी (अनुप उपाध्याय)कडे जातो आणि त्याला नोकरी सोडण्याचा आपला निर्णय सांगतो. मुरारी पंचमला जाण्यापासून थांबवतो, कारण त्याला वाटते की पंचम व छुटकीमुळे त्याचा हा बिझनेस चांगला चालतो आहे. पंचमला मुरारीने दिलेला सल्ला पटतो का आणि तो नोकरी सोडण्याचा निर्णय बदलतो का हे मालिकेतील आगामी भागात स्पष्ट होईल.
आगामी कथानकाविषयी पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराना म्हणाला, इलायची माझा आत्मसन्मान दुखावते आणि तिला वाटते की मी हे घर सोडावे व नोकरी देखील सोडावी. मुरारी याला विरोध करतो. कहाणी कशाप्रकारे समोर येते, ते प्रेक्षकांनी आगामी एपिसोडमध्येच पाहणे योग्य ठरेल.
'जीजाजी छत पर हैं' मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता सोनी सबवर प्रसारीत होते.