भारतात ‘प्रेग्नन्सी इन्शुरन्स’ का मिळत नाही ?: सोनम

By Admin | Updated: October 23, 2016 03:26 IST2016-10-23T03:26:14+5:302016-10-23T03:26:14+5:30

क रिना कपूर आणि सोनम कपूर आगामी ‘वीरे दी वेंडिंग’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. करिना गरोदर असल्याने तिने या चित्रपटाच्या शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे.

Why not get 'pregnancy insurance' in India? | भारतात ‘प्रेग्नन्सी इन्शुरन्स’ का मिळत नाही ?: सोनम

भारतात ‘प्रेग्नन्सी इन्शुरन्स’ का मिळत नाही ?: सोनम

क रिना कपूर आणि सोनम कपूर आगामी ‘वीरे दी वेंडिंग’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. करिना गरोदर असल्याने तिने या चित्रपटाच्या शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. यामुळेच ‘वीरे दी वेडिंग’ला उशीर होत असल्याचे सोनमला वाटतेय. तिने याचा दोष इन्शुरन्स कंपन्यांना दिला आहे. भारतात ‘प्रेग्नन्सी इन्शुरन्स’ मिळत नसल्याने या चित्रपटाला उशीर होत असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले. करिना कपूर आपल्या बाळाच्या आगमनाचा आनंद साजरा करीत असतानाच, सोनम कपूरला आपल्या आगामी चित्रपटाची
काळजी लागली आहे. सोनम म्हणाली, सुरुवातीला आम्हाला
चित्रपटाच्या फंडिंगसाठी प्रयत्न करावे लागले. एखादी महिला जर चित्रपटाची निर्मिती करीत असेल तर तिची आर्थिक अडचण करण्याचा प्रयत्न होतो. यातून आम्ही मार्ग काढत असतानाच करिना कपूर प्रेग्नंट झाली. आम्ही तिच्या ‘प्रेग्नन्सी इन्शुरन्स’ साठी प्रयत्न केले, मात्र तिला तो मिळाला नाही. यामुळे आमचा चित्रपट लांबणीवर पडला आहे. भारत एकमेव असा देश आहे जेथे गरोदर स्त्रियांसाठी ‘प्रेग्नन्सी इन्शुरन्स’ दिला जात नाही, असेही सोनम म्हणाली.

Web Title: Why not get 'pregnancy insurance' in India?