ऊर्मिलाला चोरून कोण पाहतंय...

By Admin | Updated: March 6, 2016 01:30 IST2016-03-06T01:30:28+5:302016-03-06T01:30:28+5:30

सेलिब्रिटीजची सेलिब्रिटीजची लाईफ अशी असते, की जिथे जाईल तिथे त्यांना कॅमेरा असो की फॅन्स सगळ््यांच्या नजरांना सामोरे जावे लागते.

Who stole Urmila and saw ... | ऊर्मिलाला चोरून कोण पाहतंय...

ऊर्मिलाला चोरून कोण पाहतंय...

सेलिब्रिटीजची सेलिब्रिटीजची लाईफ अशी असते, की जिथे जाईल तिथे त्यांना कॅमेरा असो की फॅन्स सगळ््यांच्या नजरांना सामोरे जावे लागते. काही फॅन्स तर असे असतात, की आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी त्यांचा पाठलाग करतात अन् लपून -चोरूनसुद्धा सेलिब्रिटीजना पाहतात. आता ऊर्मिला कोठारे हिच्यासोबत पण असेच काही झाले आहे. ऊर्मिला म्हणते, मला पाठीमागून कोण बरं चोरून पाहतंय. त्याचं झालं असं की, ऊर्मिला सेल्फी काढत होती अन् तिला अचानक जाणवलं, की आपल्याला कोणीतरी पाठीमागून चेक करीत आहे. आता ऊर्मिलाला असे कोण पाहत होते, याची उत्सुकता लागली असेल तर थांबा तिला कोणी फॅन नाही तर चक्क कांगारू चोरून पाहत होते. हे आम्ही नाही तर ऊर्मिला स्वत:च सांगत आहे. हुज दॅट चेकिंग मी आऊट फ्रॉम बॅक... ऊप्स इट्स कांगारू असे तिने सांगितले आहे. आता ऊर्मिला जरा जपूनच सेल्फी काढत जा, असे तिचे फॅन्स तिला नक्कीच सांगतील.

Web Title: Who stole Urmila and saw ...