'रात्री'चा खरा गुन्हेगार आहे तरी कोण?

By Admin | Updated: October 12, 2016 12:22 IST2016-10-12T12:05:53+5:302016-10-12T12:22:26+5:30

बहुचर्चित व लोकप्रिय 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका आता अंतिम वळणावर पोहोचली असून मालिकेतील खरा आरोपी कोण याबाबतचा संभ्रम अद्यापही बाकी आहे

Who is the real culprit of 'night'? | 'रात्री'चा खरा गुन्हेगार आहे तरी कोण?

'रात्री'चा खरा गुन्हेगार आहे तरी कोण?

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - बहुचर्चित व लोकप्रिय 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका आता अंतिम वळणावर पोहोचली असून मालिकेतील खरा आरोपी कोण याबाबतचा संभ्रम अद्यापही बाकी आहे. या मालिकेतील गूढ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नेने आणि अजय यांचा खून कोणी केला हे अद्याप तरी कळलेले नाही. संशयाची सुई सध्या नाईक कुटुंबातील अनेकांवर फिरत आहे. काही दिवसांपूर्वी निलिमा आणि सुषमा यांना पोलिसांनी पकडल्याचे फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर फिरत होते. त्यामुळे निलिमा आणि सुषमाच ख-या दोषी असल्याचे सगळ्यांना वाटत होते.
('हे' आहेत 'रात्रीस खेळ चाले'मधील खुनी!)
('रात्रीस खेळ चाले'मध्ये ट्विस्ट? नव्या पाहुण्याचे आगमन)
(लवकरच उलगडणार ' रात्री'चे रहस्य, मालिका घेणार निरोप!) 
 
पण आता यातही एका नवा ट्विस्ट दिसत असून आता या मालिकेचे निर्माते संतोष अयाचित यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर तीन फोटो शेअर केले आहे. एका फोटोत गुरव तर दुसऱ्या फोटोत अभिराम तर तिसऱ्या फोटोत दत्ताला पोलिसांनी अटक केल्याचे दिसत असून नक्की खरे खुनी कोण हे अद्यापही स्पष्ट झालेले दिसत नाहीये. 
 
सस्पेन्स कायम राखण्यासाठी मालिकेतील प्रत्येक कलाकारासोबत या मालिकेचा वेगवेगळा शेवट चित्रीत केला गेला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता हे तिघे तरी खरे गुन्हेगार आहेत का असचा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार हे नक्की..!
 
 
 

 

Web Title: Who is the real culprit of 'night'?