Actress Tunisha Sharma Death: शूटींगच्या सेटवर अखेर काय घडलं?; अभिनेत्री तुनिशाच्या मृत्यूनंतर उभे राहिले ५ प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 08:24 AM2022-12-25T08:24:15+5:302022-12-25T08:25:31+5:30

अभिनेत्री तुनिशा शर्माच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. तिच्या कथित आत्महत्येनंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.

What finally happened on the shooting sets of Ali Baba?; 5 questions raised after the death of actress Tunisha sharma | Actress Tunisha Sharma Death: शूटींगच्या सेटवर अखेर काय घडलं?; अभिनेत्री तुनिशाच्या मृत्यूनंतर उभे राहिले ५ प्रश्न

Actress Tunisha Sharma Death: शूटींगच्या सेटवर अखेर काय घडलं?; अभिनेत्री तुनिशाच्या मृत्यूनंतर उभे राहिले ५ प्रश्न

googlenewsNext

मुंबई -  टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या गूढ मृत्यूने अनेक प्रश्न मागे सोडले आहेत. तिचे कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त सर्वसामान्यांनाही या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत. उदाहरणार्थ, वयाच्या २० व्या वर्षी स्वत:च्या बळावर टेलिव्हिजन इंडस्ट्रीत इतकं मोठं स्थान मिळवलेल्या या अभिनेत्रीने अचानक मृत्यूचा मार्ग का निवडला किंवा तुनिशाने कथित आत्महत्येसाठी तिचा सहकलाकार शीजानची मेकअप रूम का निवडली? अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर असे पाच प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना त्यांच्या तपासात लवकरच मिळतील, अशी अपेक्षा आहे.

  1. आत्महत्येपूर्वी तुनिशाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. शेवटच्या व्हिडीओमध्ये तुनिशाचे केस नीट केले जात होते. मुंबईतील शूटिंगच्या काही तास आधी हा क्षण खुद्द तुनिशाने सोशल मीडियावर शेअर केला होता. मग असे काय झाले की तिने अचानक आत्महत्या केली?
  2. तुनिशाच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांच्या टीमने अलिबाबाच्या सेटवर युनिट मेंबर्सची चौकशी केली. चौकशीदरम्यान तुनिशाने तिचा को-स्टार शीजानच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या केल्याचं समोर आले. जेव्हा शीजान त्याच्या शॉटनंतर मेकअप रूममध्ये पोहोचला तेव्हा त्याने अनेकदा आवाज दिला. त्यानंतर त्याने मेकअप रूमचा दरवाजा तोडला आणि तुनिशाला पाहून तो हैराण झाला. तुनिशाने शीजानच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या का केली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
  3. तुनिशा फक्त २० वर्षांची होती आणि इतक्या लहान वयात तिला अली बाबा - दास्तान ए काबुल या लोकप्रिय शोमध्ये मरियमची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली, ती सध्या तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीच्या दृष्टीने खूप चांगला वेळ घालवत होती. ती प्रसिद्ध होत होती. मग तिला कथित आत्महत्येसारखे पाऊल का उचलावे लागले?
  4. तुनिशा खूप आनंदी मुलगी होती. सेटवर ती नेहमी हसत-खेळत असायची. कथित आत्महत्येपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओही पोस्ट केला होता, मग तुनिशाने मृत्यूला का कवटाळलं? एवढ्या लहान वयाच्या मुलीने मृत्यूचा हा मार्ग का निवडला?
  5. तुनिशाने मृत्यूला कवटाळण्यासाठी तिचा सहकलाकार शीजानची मेकअप रूम का निवडली? या प्रश्नाशिवाय एक प्रश्न असाही उपस्थित होत आहे की शूटिंग सेटवर इतके लोक उपस्थित होते, मग तुनिशाला सेटवर आत्महत्या करताना कोणी पाहिले नाही का?

 

तुनिशा शनिवारी तिच्या 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या शूटिंगसाठी नायगाव येथील सेटवर पोहोचली. तुनिशाचा को-स्टार शीजानच्या म्हणण्यानुसार, तो दुपारी ३ वाजता त्याच्या मेकअप रूमजवळ पोहचला. तेव्हा रुमचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दार न उघडल्याने त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत तुनिशाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
 

Web Title: What finally happened on the shooting sets of Ali Baba?; 5 questions raised after the death of actress Tunisha sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.