दिल्लीत विवाह सोहळा

By Admin | Updated: January 18, 2016 03:04 IST2016-01-18T03:04:27+5:302016-01-18T03:04:27+5:30

‘गजनी’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी आसिन, येत्या १९ जानेवारीला व्यावसायिक राहुल शर्माशी विवाह बंधनात अडकणार आहे.

Wedding ceremony in Delhi | दिल्लीत विवाह सोहळा

दिल्लीत विवाह सोहळा

‘गजनी’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी आसिन, येत्या १९ जानेवारीला व्यावसायिक राहुल शर्माशी विवाह बंधनात अडकणार आहे. दिल्लीच्या एका पॉश हॉटेलमध्ये दिमाखदार समारंभात विवाह पार पडणार असून, दोघांच्याही धर्मांचा आदर करत, सकाळी ख्रिचन पद्धतीने तर सायंकाळी हिंदू रीतरिवाजाप्रमाणे लग्न होणार आहे. हॉटेलमध्येच तयार करण्यात आलेल्या चर्चमध्ये ५० जवळच्या आप्तेष्टांना आमंत्रित करण्यात आले असून, सायंकाळी सुमारे २०० पाहुणे असणार आहेत. सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला स्पेशल ड्रेस आसिन परिधान करणार असून, प्रसिद्ध शेफ निशांत चौबेने खास १० थरांचा व्हॅनिला केक तयार केला आहे. २३ जानेवारीला मुंबईत बॉलीवूड सेलिबे्रंटिसाठी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. अक्षयकुमारे नुकतेच इन्स्टाग्रामवर ते पोस्ट केले आहे.

Web Title: Wedding ceremony in Delhi