'द फॅमिली मॅन ३'मध्ये जयदीप अहलावतने 'रुक्मा'ची भूमिका का स्वीकारली? म्हणाला- "हे एक खास स्वातंत्र्य होतं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 19:08 IST2025-11-27T19:05:40+5:302025-11-27T19:08:59+5:30
Jaideep Ahlawat : अभिनेता जयदीप अहलावत नुकताच मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन ३' वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाला. त्याने क्रूर खलनायक 'रुक्मा'चे पात्र साकारले आहे.

'द फॅमिली मॅन ३'मध्ये जयदीप अहलावतने 'रुक्मा'ची भूमिका का स्वीकारली? म्हणाला- "हे एक खास स्वातंत्र्य होतं..."
अभिनेता जयदीप अहलावत नुकताच मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन ३' वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाला. त्याने क्रूर खलनायक 'रुक्मा'चे पात्र साकारले आहे. एका मुलाखतीत जयदीप अहलावतने 'द फॅमिली मॅन ३'मधील 'रुक्मा'चे पात्र का स्वीकारले याबद्दल सांगितले.
'मिड डे'शी बोलताना जयदीप अहलावत म्हणाला की, नागालँडने त्याला 'पाताल लोक'मध्ये 'हाथीराम' म्हणून पाहिले होते आणि आता 'द फॅमिली मॅन ३'मध्ये तिथेच तो 'रुक्मा' बनला. तो म्हणाला, "ही तीच जागा आहे जिथे मी आधी 'हाथीराम' म्हणून उभा होतो आणि नंतर 'रुक्मा' म्हणून. जागा तीच आहे, पण दोन्ही व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळ्या आहेत. इथे कला दिग्दर्शन खूप बदलले आहे. एकाच ठिकाणी असूनही, पूर्णपणे वेगळे जीवन जगणे हा एक मनोरंजक अनुभव आहे."
"नागालँड दुसरं घर बनलंय"
हसत तो म्हणाला की, "हे राज्य आता त्याचे दुसरे घर बनले आहे. मी कोहिमामध्ये इतके शूटिंग केले आहे की नागालँड सरकारने मला तिथे एक घर द्यावे! या भूमिकेमुळे, शेवटी मला अंतरात्मा किंवा परिणामांची चिंता न करता मोकळेपणाने जगण्याची संधी मिळाली."
'रुक्मा'ची भूमिका का साकारली?
या भूमिकेबद्दल बोलताना त्याने कबूल केले की, "पहिल्या दिवशी मला आठवतंय की, मी विचार केला, माझी ही भूमिका 'हाथीराम चौधरी'सारखी अजिबात नाहीये. तुम्ही हे कसं समजून घेता? मग मला जाणवलं की, समजून घ्यायची गरज नाही, तुम्ही फक्त दोन्ही भूमिकांचा आनंद घ्या. रुक्मासारखं पात्र साकारणं हा एका वेगळ्याच प्रकारचा, स्वातंत्र्य देणारा अनुभव होता."
मनोज वाजपेयींसोबतच्या कामाबद्दल म्हणाला...
'चटगाँव' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या चाहत्यांसाठी 'द फॅमिली मॅन ३'मध्ये जयदीप अहलावत आणि मनोज वाजपेयींचे एकत्र येणे खूपच आनंददायक होते. यावर जयदीप म्हणाला, "मनोजसोबत काम करणं म्हणजे वेळेत मागे गेल्यासारखं आहे. ते एक शिस्त घेऊन येतात. इतक्या वर्षांनंतर त्यांच्यासोबत ॲक्शन सीन करणं रोमांचक होतं. त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असते आणि हा शो एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखा आहे."