जुही चावला आणि आयशा जुल्का यांची वेबसीरिज 'हुश हुश'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 08:09 PM2022-09-13T20:09:38+5:302022-09-13T20:10:13+5:30

Hush Hush Web Series : जुही चावला आणि आयशा जुल्का 'हुश हुश' या वेब सीरिजद्वारे ओटीटीच्या जगात पदार्पण करणार आहेत.

Trailer release of Juhi Chawla and Ayesha Julka's web series 'Hush Hush' | जुही चावला आणि आयशा जुल्का यांची वेबसीरिज 'हुश हुश'चा ट्रेलर रिलीज

जुही चावला आणि आयशा जुल्का यांची वेबसीरिज 'हुश हुश'चा ट्रेलर रिलीज

googlenewsNext

ओटीटीच्या जगात, हत्येच्या रहस्यावर आधारित आणखी एक नवीन वेब सीरीज दाखल होणार आहे. या सीरिजचे नाव आहे 'हुश-हुश' (Hush Hush). ही सीरिज Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. जुही चावला (Juhi Chawla) आणि आयशा जुल्का (Ayesha Jhulka) या वेब सीरिजद्वारे ओटीटीच्या जगात पदार्पण करणार आहेत. या मालिकेत सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि कृतिका कामरा (Krutika Kamra) देखील दिसणार आहेत. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित होणार आहे.

वेबसीरिजचा ट्रेलर सर्व रहस्य आणि नाटकांनी भरलेला आहे. सीरिजची कथा चार मैत्रिणींच्या जीवनावर आधारित आहे. एका घटनेनंतर त्यांचे आयुष्य बदलते. त्यांच्या आयुष्यात असे काही घडते ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना या मालिकेत पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.  सात भागांची हुश हुश ही वेबसीरिज तनुजा चंद्रा यांनी दिग्दर्शित केली आहे. वेब सिरीजचे संवाद राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखिका जुही चतुर्वेदी यांनी लिहिले आहेत. यापूर्वी जुही यांनी गुलाबो सिताबो, पिकू, सरदार उधम सिंग या चित्रपटांसाठी संवादही लिहिले आहेत. विक्रम मल्होत्राच्या अबंडंटिया एंटरटेनमेंट द्वारे निर्मित, हुश हुश २२ सप्टेंबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर भेटीला येणार आहे.


ट्रेलर लॉन्च दरम्यान, जुही चावला म्हणाली, “मी प्राइम व्हिडिओसह वेगाने वाढणाऱ्या डिजिटल क्षेत्रात नवीन प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहे. त्या असामान्य कामाची मी नेहमीच चाहती आहे. तसेच सोहा, शहाना, कृतिका, करिश्मा आणि आयशा यांसारख्या अभूतपूर्व कलाकारांसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे.

Web Title: Trailer release of Juhi Chawla and Ayesha Julka's web series 'Hush Hush'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.