अभय महाजन, ललित प्रभाकर, आलोक राजवाडे त्रिकुट पुन्हा दिसणार एकत्र 'शांतीत क्रांती २'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 03:46 PM2023-09-22T15:46:47+5:302023-09-22T15:47:12+5:30

Shantit Kranti : पहिल्‍या सीझनला भव्‍य यश मिळाल्‍यानंतर 'शांतीत क्रांती'चा दुसरा सीझन सादर करण्‍यास सज्‍ज आहे. सीझन २मध्ये हास्‍याचा दुहेरी डोस मिळणार आहे.

The trio of Abhay Mahajan, Lalit Prabhakar, Alok Rajwade will be seen together again in 'Shanti Kranti 2'. | अभय महाजन, ललित प्रभाकर, आलोक राजवाडे त्रिकुट पुन्हा दिसणार एकत्र 'शांतीत क्रांती २'मध्ये

अभय महाजन, ललित प्रभाकर, आलोक राजवाडे त्रिकुट पुन्हा दिसणार एकत्र 'शांतीत क्रांती २'मध्ये

googlenewsNext

पहिल्‍या सीझनला भव्‍य यश मिळाल्‍यानंतर 'शांतीत क्रांती'चा दुसरा सीझन सादर करण्‍यास सज्‍ज आहे. सीझन २मध्ये हास्‍याचा दुहेरी डोस मिळणार आहे. १८ महिन्‍यांनंतर एकत्र येत श्रेयस (अभय महाजन) सर्व मुलांना विवाह करत असल्‍याची आनंदाची बातमी देतो आणि तिन्‍ही मुले श्रेयसच्‍या इंटरनॅशनल बॅचलर ट्रिपवर जाण्‍याचे ठरवतात. श्रेयसचा साखरपुडा झालेला नाही, प्रसन्‍नने (‍ललित प्रभाकर) त्‍याच्‍या बाळाला सोबत आणले आहे आणि दिनारने (अलोक राजवडे) बॅचलरच्‍या ट्रिपऐवजी १० अनोळखी व्‍यक्‍तींसह नेपाळला ६ दिवसांच्‍या तीर्थयात्रेवर जाण्‍यासाठी बस बुक केली आहे हे समजल्‍यानंतर स्थिती वेगळे वळण घेते.

ललित प्रभाकर म्‍हणाला, ''शांतीत क्रांती सीझन १ ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम मिळाले. आम्‍हाला नवीन सीझनसह पुनरागमन करण्‍याचा आनंद होत आहे, जेथे आम्‍ही उलगडे, हास्‍य, ट्विस्‍ट्स, रोमांचने भरलेल्‍या नवीन प्रवासाची सुरूवात करत आहोत. हा सीझन नात्‍यांना पुनर्परिभाषित करतो, तसेच नवीन पात्रांना सादर करतो, जे आमच्‍यापैकी प्रत्‍येकाला पुढे जाण्‍यास मदत करतात. आम्‍ही आशा करतो की, हा सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन करेल आणि त्‍यांच्‍याशी संलग्‍न होईल.''

भडिपासह सहयोगाने टीव्‍हीएफची निर्मिती आणि अरूनभ कुमारद्वारे निर्मित शोचे दिग्‍दर्शन सारंग साठ्ये व पौला मॅकग्‍लीन यांनी केले आहे. या सिरीजमध्‍ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर हे स्‍टार कलाकार आहेत.

Web Title: The trio of Abhay Mahajan, Lalit Prabhakar, Alok Rajwade will be seen together again in 'Shanti Kranti 2'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.