मराठमोळा प्रथमेश परब भुवन बामच्या वेब सीरिजमध्ये झळकणार, 'ताजा खबर २'चा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 04:16 PM2024-04-05T16:16:11+5:302024-04-05T16:16:43+5:30

'ताजा खबर २'ची घोषणा करण्यात आली असून त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या वेब सीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

taaza khabar 2 teaser prathmesh parab to play important role in bhuvan bam web series | मराठमोळा प्रथमेश परब भुवन बामच्या वेब सीरिजमध्ये झळकणार, 'ताजा खबर २'चा टीझर प्रदर्शित

मराठमोळा प्रथमेश परब भुवन बामच्या वेब सीरिजमध्ये झळकणार, 'ताजा खबर २'चा टीझर प्रदर्शित

गेल्यावर्षी भुवन बामची ताजा खबर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आता या सीरिजचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ताजा खबर २'ची घोषणा करण्यात आली असून त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या वेब सीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'ताजा खबर २'च्या टीझरमध्ये प्रथमेशची झलक पाहायला मिळत आहे. 

भुवन बाम मुख्य भूमिकेत असलेली 'ताजा खबर' ही वेब सीरिज जानेवारी २०२३मध्ये प्रदर्शित झाली होती. वसंत गावडे या व्यक्तिरेखेच्या अवतीभोवती या सीरिजची कहानी फिरते. वसंत गावडेकडे अशी शक्ती असते ज्यामुळे त्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांबाबत आधीच माहीत होत असतं. आता या वेब सीरिजच्या टीझरमध्ये वसंत गावडेची हत्या झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. या सीरिजमध्ये प्रथमेश परब राजा चतुर्वेदी ही भूमिका साकारत आहे. वसंत गावडेची हत्या झाल्यानंतर प्रथमेश रडत असल्याचं टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. 'ताजा खबर २'चा टीझर प्रथमेशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

प्रथमेशने 'ताजा खबर' या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता तो या सीरिजच्या सीक्वलमध्येही दिसणार आहे. प्रथमेशबरोबर या सीरिजमध्ये श्रीया पिळगावकर, अतिशा नाईक, विजय निकम, महेश मांजरेकर हे मराठमोळे कलाकारही झळकले आहेत. हॉटस्टारवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: taaza khabar 2 teaser prathmesh parab to play important role in bhuvan bam web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.