संध्याकाळी 4 वाजता ‘Squid Game’चा प्रीमिअर झाला अन् 5 वाजता ‘तो’ स्टार झाला...! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 02:16 PM2021-10-19T14:16:52+5:302021-10-19T14:28:18+5:30

Squid Game : वाचा, अनुपम त्रिपाठी या भारतीय अभिनेत्याच्या ‘स्टार’ बनण्याची कहाणी

'Squid Game' star Anupam Tripathi talks about his 'fun' journey | संध्याकाळी 4 वाजता ‘Squid Game’चा प्रीमिअर झाला अन् 5 वाजता ‘तो’ स्टार झाला...! 

संध्याकाळी 4 वाजता ‘Squid Game’चा प्रीमिअर झाला अन् 5 वाजता ‘तो’ स्टार झाला...! 

googlenewsNext
ठळक मुद्देअनुपमने ‘ओड टू माय फादर’ या चित्रपटात आणि ‘डिसेंडंट्स ऑफ द सन’  या अत्यंत लोकप्रिय कोरियन सीरिजमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत.

‘स्क्विड गेम’  (Squid Game) या वेबसीरिजनं चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. सीरिजचा प्रीमिअर झाला आणि जगातील अनेक देशांत ही सीरिज पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करू लागली. गेल्या महिन्यात 17 सप्टेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर ( Netflix ) प्रदर्शित झाली आणि अवघ्या महिनाभरात या सीरिजनं अनेक विक्रम मोडीत काढले. आत्तापर्यंतच्या अनेक सीरिजला मागे टाकत दक्षिण कोरियाच्या ही वेबसीरिजनेटफ्लिक्सवरची नंबर वन सीरिज बनली. इतकंच नाही तर या सीरिजनं एका भारतीयाला एका रात्रीत स्टार केलं. होय, त्याचं नाव अनुपम त्रिपाठी (Anupam Tripathi ). सीरिजमध्ये त्यानं अली नावाच्या एका पाकिस्तानी व्यक्तिची भूमिका साकारली आहे. 
अनुपमचा जन्म भारतातला. पण तो सध्या   साऊथ कोरियात शिकतोय. ‘स्क्विड गेम’मुळे अवघ्या तासाभरात माझं आयुष्य बदललं, अशी प्रतिक्रिया अनुपमने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे.

17 सप्टेंबरला संध्याकाळी 4 वाजता नेटफ्लिक्सवर ‘स्क्विड गेम’चा प्रीमिअर झाला. तोपर्यंत अनुपमला फारसं कुणी ओळखतं नव्हतं. पण 5 वाजता म्हणजे तासाभरात त्याचे फोन खणखणू लागले.   सोशल मीडियावर त्याच्या नावाच्या असंख्य पोस्ट पडल्या. कौतुक, अभिनंदनाचा वर्षाव झाला. अवघ्या तीन हजारांवरून तीन दशलक्ष फॉलोअर्स झालेत आणि अनुपम स्टार बनला...

अनुपम हा दिल्लीचा. दिल्लीतचं तो लहानाचा मोठा झाला. नाटकं, संगीत यांची आवड  लहानपणापासूनच होतीच. त्यामुळे त्याला नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये जायचं होतं. मात्र नियतीच्या मनात वेगळंच काही होतं.  अभिनयाच्या जोरावर  आर्ट्स स्कॉलरशिप मिळालं आणि 2010 मध्ये अनुपम दक्षिण कोरियातील कोरिया नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्समध्ये दाखल झाला.

गेल्यावर्षी एका कोरियन कास्टिंग एजन्सीला अनुपमने एक टेप पाठवली होती आणि यानंतर त्याच्या ऑडिशन सुरू होत्या. अशात एक दिवस त्याला ‘स्क्विड गेम’ची ऑफर आली. सीरिजचे दिग्दर्शक हाँग डोंग ह्युक यांना तो भेटला. पण इथे एक समस्या होती. अनुपम रोलमध्ये फिट बसत नव्हता. बॉडी शेप ही अडचण होती. मित्रांनी यासाठी त्याला मदत केली आणि 2020 मध्ये अनुपमने ‘स्क्विड गेम’साठी शूटींग सुरू केलं. 
या सीरिजला इतकं प्रेम मिळेल, असा विचार अनुपमने स्वप्नातही केला नव्हता. पण अखेर कष्टाचं फळ मिळालं.
अनुपमने ‘ओड टू माय फादर’ या चित्रपटात आणि ‘डिसेंडंट्स ऑफ द सन’  या अत्यंत लोकप्रिय कोरियन सीरिजमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत.  

Web Title: 'Squid Game' star Anupam Tripathi talks about his 'fun' journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.