"मी दत्तक मुलगी नाही", श्रिया पिळगांवकरने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, 'बर्थ सर्टिफिकेट...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:48 AM2024-04-25T10:48:50+5:302024-04-25T10:49:52+5:30

सचिन आणि सुप्रिया पिळगांवकरांची लेक आहे श्रिया.

Shriya Pilgaonkar made it clear I am not an adopted daughter there were fake news | "मी दत्तक मुलगी नाही", श्रिया पिळगांवकरने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, 'बर्थ सर्टिफिकेट...'

"मी दत्तक मुलगी नाही", श्रिया पिळगांवकरने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, 'बर्थ सर्टिफिकेट...'

मराठीतील लोकप्रिय जोडी सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar)यांची लाडकी लेक श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) ओटीटीवर खूप प्रसिद्ध आहे. तिने अनेक गाजलेल्या वेबसीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. श्रियाने मराठी सिनेमा 'एकुलती एक' मधून पदार्पण केलं. सचिन आणि सुप्रिया यांनीच हा सिनेमा काढला होता आणि कामही केलं होतं. श्रिया या दोघांची दत्तक मुलगी आहे असाच आतापर्यंत अनेकांचा समज होता. मात्र यात तथ्य नसल्याचं नुकतंच श्रियाने स्पष्ट केलं आहे.

श्रिया पिळगांवकर आगामी 'ब्रोकन न्यूज 2' सीरिजमध्ये दिसणार आहे. सीरिजच्या प्रमोशन निमित्ताने तिने इंडिया टुडेला मुलाखत दिली. यावेळी तिने मी दत्तक मुलगी नसल्याचा खुलासा केला. ती म्हणाली, "काही वर्षांपूर्वी एका लेखात छापून आलं की मी दत्तक मुलगी आहे. मग याच्या बातम्या पसरल्या की मला आईबाबांनी दत्तक घेतलं आहे. पण हे खोटं आहे. ही काही सिद्ध करण्याची गोष्ट नाही कारण मी माझं बर्थ सर्टिफिकेट इन्स्टाग्रामवर पोस्ट करणार नाही. पण ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. माझ्याबाबतीत पसरलेली ही एकमेव निंदनीय बातमी आहे."

ती पुढे म्हणाली, "मी दूरदृष्टी ठेवून विचार करते. त्यामुळेच मी शॉर्ट टर्मचा विचार करत नाही. तसंच तुम्ही एक कलाकार म्हणून किती प्रगती करत आहात हे जास्त महत्वाचं आहे. माझे वडील गेल्या 60 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहेत आणि आजही त्यांना महत्व आहे. कारण त्यांच्यात अजूनही शिकण्याची इच्छा आहे. 

Web Title: Shriya Pilgaonkar made it clear I am not an adopted daughter there were fake news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.