Farzi 2 : शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजचा सीक्वल येणार! अभिनेता म्हणाला, "पहिल्या भागाच्या शेवटी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:49 AM2023-10-12T11:49:57+5:302023-10-12T11:50:27+5:30

बनावट नोटा छापून त्याचं स्मगलिंग करण्यावर आधारित असलेली 'फर्जी' वेब सीरिज प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. या सीरिजमधील शाहिदच्या भूमिकेचं प्रचंड कौतुकही झालं होतं. आता 'फर्जी' सीरिजचा सीक्वल येणार असल्याची चर्चा आहे. 

shahid kapoor confirms farzi 2 said it is definitely happening | Farzi 2 : शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजचा सीक्वल येणार! अभिनेता म्हणाला, "पहिल्या भागाच्या शेवटी..."

Farzi 2 : शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजचा सीक्वल येणार! अभिनेता म्हणाला, "पहिल्या भागाच्या शेवटी..."

'जब वी मेट', 'विवाह', 'कबीर सिंग', 'ब्लडी डॅडी', 'पद्मावत' अशा चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारुन शाहिद कपूरने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या शाहिदचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. मोठा पडदा गाजवल्यानंतर शाहिदला ओटीटीची भुरळ पडली. २०२३च्या सुरुवातीला 'फर्जी' वेब सीरिजमधून शाहिदने ओटीटीवर पदार्पण केलं. बनावट नोटा छापून त्याचं स्मगलिंग करण्यावर आधारित असलेली ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. या सीरिजमधील शाहिदच्या भूमिकेचं प्रचंड कौतुकही झालं होतं. आता 'फर्जी' सीरिजचा सीक्वल येणार असल्याची चर्चा आहे. 

'फर्जी'ला मिळालेल्या प्रतिसादानंतर 'फर्जी २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द शाहिदने 'फर्जी'च्या सीक्वलबाबात भाष्य केलं आहे. 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला, "हो, फर्जीचा सीक्वल येणार आहे. फर्जीला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्याप्रकारे पहिल्या भागाचा शेवट करण्यात आला. त्यानुसार पुढे खूप काही घडू शकतं. पण, हो फर्जी २ येणार हे नक्की."

शाहिदने या मुलाखतीत त्याच्या इतर प्रोजेक्टबद्दलही भाष्य केलं. "यावर्षी माझे २ प्रोजेक्ट रिलीज होणार आहेत. त्यामुळे मी इतर कोणत्याही ओटीटी प्रोजेक्टला होकार दिलेला नाही. पण, मला काही वेगळं आवडलं. तर मी नक्कीच त्याचा विचार करेन. सध्या मी चित्रपटासाठी विचार करत आहे," असंही शाहिदने सांगितलं. 

'फर्जी' वेब सीरिज फेब्रुवारी २०२३मध्ये अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आली होती. या सीरिजमधून शाहिद कपूरबरोबरच दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीनेही ओटीटीवर पदार्पण केलं होतं. या सीरिजमध्ये भुवन अरोरा, केके मेनन, काव्या थापर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: shahid kapoor confirms farzi 2 said it is definitely happening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.