विद्यार्थिनीच्या हत्येच्या तपास अन् खिळवून ठेवणारे ट्विस्ट! OTT वरील 'ही' मर्डर मिस्ट्री सीरिज पाहून दृश्यम विसराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 14:14 IST2025-10-15T14:10:25+5:302025-10-15T14:14:43+5:30
जबरदस्त रेटिंग असलेली OTT वरील 'ही' मर्डर मिस्ट्री सीरिज पाहून फुटेल घाम, कुठे पाहाल?

विद्यार्थिनीच्या हत्येच्या तपास अन् खिळवून ठेवणारे ट्विस्ट! OTT वरील 'ही' मर्डर मिस्ट्री सीरिज पाहून दृश्यम विसराल
Webseries: हल्ली ओटीटीवर क्राइम थ्रिलर, मर्डर मिस्ट्री सिनेमा पाहण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. या माध्यमावर दररोज नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होतात. त्यातील काही सीरिजमधील सस्पेंन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतो तर काहींचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना भुर घालतो. डिजीटल प्लॅफॉर्मवर अशा वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे, सीरिज उपलब्ध आहेत. अशाच एका वेब सीरिजची ओटीटीवर क्रेझ निर्माण झाली आहे. अशाच एक मर्डर मिस्ट्री सीरिजला ओटीटीप्रेमींची पसंती मिळत असून ती तु्म्ही घरबसल्या पाहू शकता. 'सर्च द नैना मर्डर केस' असं या सीरिजचं नाव आहे.
'सर्च द नैना मर्डर केस' ही वेब सिरीज १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाली.६ भागांची ही एक मर्डर मिस्ट्री सीरिज आहे. एक रहस्यमयी खून आणि त्यातील दमदार ट्विस्ट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. रिलीजनंतर, ही सीरिज जिओ हॉटस्टारवर ट्रेंडिंग आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा महत्वाच्या भूमिकेत आहे. त्यामध्ये तिने एसीपी संयुक्ता दास यांची भूमिका साकारली आहे. रोहन सिप्पी यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. तसंच सीरिजमध्ये श्रद्धा दास, शिव पंडित आणि सूर्य शर्मा हे कलाकारांच्या भूमिका आहेत. सप्पेंन्सच्या बाबतीत ही सीरिज दृश्यमला टक्कर देते.
सर्च द नैना मर्डर केस या सीरिजचं कथानक एका विद्यार्थिनीच्या हत्येच्या तपासाभोवती फिरतं. ही सीरिज डॅनिश हिट चित्रपट द किलिंग चा भारतीय रिमेक आहे. सर्च द नैना मर्डर केसला आयएमडीबीवर ६.१ रेटिंग मिळाले आहे, ज्यावरून हे स्पष्ट होतंय की ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.