'ताली'मधील सुव्रतची भूमिका पाहून हमसून रडली सखी गोखले, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, "काहीतरी भयंकर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 03:16 PM2023-09-26T15:16:46+5:302023-09-26T15:18:03+5:30

सुव्रत जोशी आणि सखी गोखलेने 'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती.

sakhi gokhale cry after watching suvrat joshi role in taali web series | 'ताली'मधील सुव्रतची भूमिका पाहून हमसून रडली सखी गोखले, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, "काहीतरी भयंकर..."

'ताली'मधील सुव्रतची भूमिका पाहून हमसून रडली सखी गोखले, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, "काहीतरी भयंकर..."

googlenewsNext

सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेली 'ताली' ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली. तृतीयपंथी गौरी सावंत यांचा संघर्षमय प्रवास या सीरिजमधून मांडण्यात आला आहे. रवी जाधव दिग्दर्शित ताली वेब सीरिजमध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली. मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीही या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. 'ताली'मध्ये तो तृतीयपंथाच्या भूमिकेत आहे. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल भाष्य केलं. 

सुव्रत जोशी आणि सखी गोखलेने 'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत सुव्रत आणि सखीने वैयक्तिक आयुष्य आणि मनोरंजन क्षेत्रातील करिअरबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांना "सुव्रतची तालीमधील भूमिका पाहून सखीची काय रिएक्शन होती?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ताली पाहून सखी रडल्याचं सुव्रतने सांगितलं. 

सुव्रत म्हणाला, "ताली बघायला आम्ही एकत्र बसलो होतो. तिसऱ्या-चौथ्या एपिसोडपासून मी जास्त दिसतो. जेव्हा चौथा एपिसोड सुरू झाला. त्यानंतर पाच मिनिटांनी मी तिच्याकडे पाहिलं. ती हमसून हमसून रडत होती. तिच्या डोळ्याचं काजळ पूर्ण उतरलं होतं. काहीतरी भयंकर घडल्यासारखं ती रडत होती. तुला मारलंय..तुला असे रोल देतात, हे मला आवडत नाही, असं ती मला म्हणाली. तूदेखील एक अभिनेत्री आहेस, असं मला तेव्हा झालं होतं." 

दरम्यान, सुव्रत आणि सखीने २०१९ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. त्यादरम्यानच त्याच्यांतील प्रेमसंबंध फुलले. सुव्रत आणि सखी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत ते प्रेम व्यक्त करत असतात

Web Title: sakhi gokhale cry after watching suvrat joshi role in taali web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.