पाकिस्तानचा श्रीमंत बाजार वेश्याव्यवसायाचं प्रमुख केंद्र कसं बनला? भन्सालींच्या 'हिरामंडी'ची खरी कहाणी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 01:45 PM2024-02-08T13:45:38+5:302024-02-08T13:49:18+5:30

संजय लीला भन्सालींच्या आगामी 'हिरामंडी' वेबसिरीजची उत्सुकता शिगेला आहे. काय आहे याची खरी कहाणी? (Heeramandi) (Sanjay Leela Bhansali)

real story of heeramandi the diamond bazaar directed by sanjay leela bhansali | पाकिस्तानचा श्रीमंत बाजार वेश्याव्यवसायाचं प्रमुख केंद्र कसं बनला? भन्सालींच्या 'हिरामंडी'ची खरी कहाणी जाणून घ्या

पाकिस्तानचा श्रीमंत बाजार वेश्याव्यवसायाचं प्रमुख केंद्र कसं बनला? भन्सालींच्या 'हिरामंडी'ची खरी कहाणी जाणून घ्या

काही दिवसांपुर्वी संजय लीला भन्सालींच्या (Sanjay Leela Bhansali) 'हिरामंडी'ची झलक बघायला मिळाली. या वेबसिरीजच्या माध्यमातून भन्साली हिरामंडीची (Heeramandi : The Diamond Bazaar) कहाणी लोकांसमोर घेऊन येत आहेत. काय आहे हिरामंडीची कहाणी. पाकिस्तानाची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरामंडीचं वेश्याव्यवसायात कसं रुपांतर झालं? जाणून घ्या...

'हिरामंडी: द डायमंड बाजार'ची कथा
लाहोरमध्ये असलेला पाकिस्तानचा शाही मोहल्ला अर्थात हिरामंडीचं नाव पंजाब प्रांताचा राजा हिरा सिंग नाभा याच्यावरून घेण्यात आलं.  याला पाकिस्तानचा रेड लाईट भाग म्हणूनही ओळखलं जातं. एक काळ असा होता की, हिरामंडी भाग हा संस्कृतीचा आदर्श म्हणून ओळखला जायचा. मुघल काळात या ठिकाणी संगीत आणि नृत्याचे विविध कार्यक्रम होत असत.  पण हळूहळू हा भाग वेश्याव्यवसायाचे केंद्र बनला आणि 'हिरामंडी' नाव प्रसिद्ध झाले.

 

 १५व्या आणि १६व्या शतकात राजे आणि त्यांचे राजपुत्र हिरामंडी भागात संस्कृतीचा वारसा चालवत होते. पण काळ बदलला आणि हिरामंडी भाग मुघलांसाठी चैनीचे केंद्र बनला. वास्तविक अहमद शाह अब्दालीने हल्ला केला तेव्हा पहिल्यांदा 'हिरामंडी' हे नाव वेश्याव्यवसायाशी जोडले गेले, असे म्हटले जाते. या हल्ल्यात गुलाम बनलेल्या महिलांशीही सैनिकांचे संबंध होते. पुढे ब्रिटिश सत्तेच्या आगमनाने हिरामंडी हा वेश्याव्यवसायाचे केंद्र बनला.


हिरामंडीचा परिसर पुढे बदनामीने प्रचंड कलंकित झाला. इंग्रजांनी वेश्यांना सेक्स वर्कर बनण्यास भाग पाडले आणि हळूहळू लोकांना या जागेचे नाव घेतानाही लाज वाटू लागली. आता संजय लीला भन्साळी या 'हिरामंडी'ची कथा त्यांच्या वेब सीरिजमध्ये दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Web Title: real story of heeramandi the diamond bazaar directed by sanjay leela bhansali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.