'मिर्झापूर'मध्ये इंटिमेट सीन करण्यापूर्वी..., रसिका दुग्गलने सांगितला सीरिजचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:07 IST2025-11-18T16:06:16+5:302025-11-18T16:07:41+5:30
एका मुलाखतीत तिने 'मिर्झापूर'मधील बोल्ड सीन्सवर भाष्य केलं.

'मिर्झापूर'मध्ये इंटिमेट सीन करण्यापूर्वी..., रसिका दुग्गलने सांगितला सीरिजचा अनुभव
'मिर्झापूर' या ओटीटीवरील लोकप्रिय सीरिजवर सिनेमा येत आहे. सीरिजमध्ये पंकज त्रिपाठींनी कमाल काम केलं. तेच सिनेमातही दिसणार आहेत. या सीरिजमुळे पंकज त्रिपाठींना वेगळी ओळख मिळवून दिली. आणखी एका कलाकाराचं या सीरिजमुळे खूप कौतुक झालं. ती म्हणजे रसिका दुग्गल. सीरिजमध्ये ती बिना त्रिपाठीच्या भूमिकेत होती. रसिका सध्या 'दिल्ली क्राइम ३' सीरिजमुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत तिने 'मिर्झापूर'मधील बोल्ड सीन्सवर भाष्य केलं.
अभिनेत्री रसिका दुग्गलला 'मिर्झापूर' सीरिज कशी मिळाली होती? दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत रसिका म्हणाली, "मिर्झापूर सीरिजच्या पहिल्या सीझनचा क्रिएटर करण अंशुमन माझा मित्र आहे. कोणीतरी मला सांगितलं होतं की करण एका गोष्टीवर काम करत आहे तर मी त्याला असाच एकदा मेसेज पाठवला होता. मी थोडी संकोचलेही होते कारण तो माझा मित्र होता. मी मेसेज केल्यानंतर त्याचा लगेच रिप्लाय आला की भेटून बोलू. त्याने मला गोष्ट ऐकवली आणि मी इंटरेस्टेड आहे का विचारलं. मला तर गोष्ट आवडली होती. त्याला वाटलं मी मंटोसारखे सिनेमे करत आहे तर वेबसीरिज करणार नाही."
ती पुढे म्हणाली,"मग त्याने मला ऑडिशन द्यायला सांगितली. मी अनमोल आणि अभिषेक बॅनर्जीच्या कास्टिंग कंपनीमध्ये ऑडिशन दिलं. मला वाटलं मी खूप वाईट ऑडिशन दिली आहे आणि मी रिजेक्ट होईल. कदाचित माझी फिजिक त्या भूमिकेसाठी नव्हती. मग मी शोचे निर्माते अब्बास यांना फोन केला आणि विचारलं की मी पुन्हा एकदा ऑडिशन देऊ का? ते म्हणाले काळजी करु नको तू चांगलं काम केलं आहे. नंतर कॉल करुन त्यांनी मला माझं सिलेक्शन झाल्याचं सांगितलं."
'मिर्झापूर'मधील बोल्ड सीन्स करताना ऑकवर्ड वाटलं का? यावर ती म्हणाली, "अजिबात नाही, कारण ते सीन कथेची गरज होते. सेन्सेशनलाईज करण्यासाठी ते वापरले गेले नव्हते. लेखक पुनित कृ्ष्ण यांनी प्रत्येक भूमिकेला संवेदनात्मकरित्या बोल्ड केलं होतं. इंटिमेट सीनवेळी पुनित, गुरमीत आणि करणने शूटआधी मला प्रत्येक शॉटविषयी सांगितलं होतं. सेटवर कोण असणार, क्लोज सेट असेल अशी सगळी चर्चा झाली होती. माझ्या कंफर्टसाठी हे गरजेचं होतं. आता तर इंटिमसी कोऑर्डिनेटर आले आहेत पण तेव्हा नव्हते."