राधिका आपटेनं दुसऱ्यांदा गुपचूप बांधली लग्नगाठ?, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 10:54 AM2023-08-12T10:54:45+5:302023-08-12T10:56:01+5:30

Radhika Apte: राधिका आपटेचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

Radhika Apte secretly tied the knot for the second time?, the photo is going viral | राधिका आपटेनं दुसऱ्यांदा गुपचूप बांधली लग्नगाठ?, फोटो होतोय व्हायरल

राधिका आपटेनं दुसऱ्यांदा गुपचूप बांधली लग्नगाठ?, फोटो होतोय व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूडची बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. आपल्या आत्तापर्यंतच्या सिने करिअरमध्ये राधिकाने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच ती बोल्ड आणि बेधडक वक्तव्यासाठी ओळखली जाते. राधिका सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यानचा सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहून तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे का, अशी चर्चा होताना दिसत आहे.

राधिका आपटेने इंस्टाग्रामवर वधूच्या गेटअपमधले फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहे. तिने गोल्डन रंगाची साडी नेसली आहे. केसात गजरा माळला आहे. या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांना तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

राधिका आपटे हिचा वधूच्या गेटअपमधला फोटो तिची आगामी वेबसीरिज मेड इन हेवन २मधील आहे. मेड इन हेवन वेबसीरिजचा पहिला सीझन २०१९मध्ये प्रदर्शित झाला.

या सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता प्रेक्षक दुसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत होते. नुकतीच ही सीरिज रिलीज झाली आहे. दुसऱ्या भागात राधिका आपटेच नाही तर मृणाल ठाकूरही वधूच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.  

Web Title: Radhika Apte secretly tied the knot for the second time?, the photo is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.