'राज वही है मोहरे बदल गए', पंकज त्रिपाठीच्या 'मिर्झापूर 3' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 03:05 PM2024-06-20T15:05:55+5:302024-06-20T15:07:16+5:30

'मिर्झापूर 3' चा रक्तरंजित ट्रेलर रिलीज झालाय. यंदाचं 'मिर्झापूर 3' भन्नाट असणार यात शंका नाही (mirzapur 3)

Pankaj Tripathi Mirzapur 3 Trailer Released pankaj tripathi ali fazal vijay varma | 'राज वही है मोहरे बदल गए', पंकज त्रिपाठीच्या 'मिर्झापूर 3' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

'राज वही है मोहरे बदल गए', पंकज त्रिपाठीच्या 'मिर्झापूर 3' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

'मिर्झापूर 3' ची सर्वांना उत्सुकता होती. 'मिर्झापूर 3' चा टिझर काहीच दिवसांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. टिझरनंतर सर्वांना उत्सुकता होती सिनेमाच्या ट्रेलरची. आज मुंबईत 'मिर्झापूर 3' च्या ट्रेलरचा ग्रँड लॉंच झाला. याशिवाय काहीच वेळापुर्वी 'मिर्झापूर 3'चा ट्रेलर भेटीला आलाय. अत्यंत रक्तरंजित हा ट्रेलर अत्यंत भव्यदिव्य आहे. ट्रेलरमध्ये मारधाड आणि जबरदस्त डायलॉग दिसून येतात. 

'मिर्झापूर 3' चा जबरदस्त ट्रेलर

'मिर्झापूर 3' च्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं की आधीच्या सीझनचा शेवटी कालीन भय्या गायब झाले आहेत. आता मिर्झापूरमध्ये गुड्डू पंडीत राज्य करायला सज्ज आहे. त्याच्या जोडीला गोलू त्याला साथ देतेय. कालीन भय्याचं साम्राज्य उद्धव्स्त करायला सर्व गँग सज्ज आहेत. दिलखेचक संवाद आणि रक्तरंजित मारधाड ट्रेलरमध्ये बघायला मिळतेय. ट्रेलरच्या शेवटी पंकज त्रिपाठींची कालीन भय्यांच्या भूमिकेत एन्ट्री होतेय. 'हम वौ करवाएंगे जो पूर्वांचल के इतिहास में आज तक नही हुआ', असा निर्धार कालीन भय्या करतात. 

'मिर्झापूर 3' कधी रिलीज होणार?

'मिर्झापूर 3' मध्ये पुन्हा एकदा दिग्गज कलाकारांची फौज दिसतेय. पंकज त्रिपाठी, अली फजल, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी,  रसिका डुगल, विजय वर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी 'मिर्झापूर 3' ची निर्मिती केलीय. प्राईम व्हिडीओवर 'मिर्झापूर 3' रिलीज होणार आहे. ५ जुलै २०२४ ला 'मिर्झापूर 3' रिलीज होणार आहे.

Web Title: Pankaj Tripathi Mirzapur 3 Trailer Released pankaj tripathi ali fazal vijay varma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.