सैफ-करिनाच्या रिसेप्शन पार्टीत 'पंचायत' फेम हा अभिनेता होता वेटर, 'मिर्झापूर'मध्येही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 03:00 PM2024-06-08T15:00:14+5:302024-06-08T15:05:16+5:30

तो म्हणाला, मुंबईत स्वत:च्या पायावर उभं राहणं कठीण होतं...

Panchayat fame actor Asif Khan worked as waiter at Saif Kareena s reception party | सैफ-करिनाच्या रिसेप्शन पार्टीत 'पंचायत' फेम हा अभिनेता होता वेटर, 'मिर्झापूर'मध्येही केलंय काम

सैफ-करिनाच्या रिसेप्शन पार्टीत 'पंचायत' फेम हा अभिनेता होता वेटर, 'मिर्झापूर'मध्येही केलंय काम

'पंचायत' ही सध्या ओटीटीवरील लोकप्रिय सीरिज आहे. याचा तिसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. सीरिजमधील 'गजब बेइज्जती है' डायलॉग सर्वांच्याच ओठांवर आहे. हा डायलॉग ज्याच्यासाठी म्हणला गेला तो फुलेरा गावाचा जावई या सीझनमध्ये चक्क हिरो ठरलाय. पत्नीच्या गावासाठी तो असं काही करतो की सचिवजी पण त्याचे फॅन होतात. अभिनेता आसिफ खानने (Asif Khan) जावयाची भूमिका साकारली आहे. पण तुम्हाला माहितीये का आसिफ खानने सैफ अली खान-करीना कपूरच्या रिसेप्शन पार्टीत वेटरचं काम केलं होतं.

एका मुलाखतीत आसिफ खानने त्याची स्ट्रगल स्टोरी सांगितली. तो म्हणाला, "मुंबईत स्वत:च्या पायावर उभं राहणं कठीण होतं. माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर मी घराचा खर्च भागवण्यासाठी छोटी मोठी कामं करायला लागलो. पण मला अभिनय क्षेत्रात काम करायचे होते. यासाठी मी आईची समजूतही घातली होती.

अभिनयात येण्याआधी मी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचो. नंतर मला किचन डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलं गेलं. तेव्हा आम्हाला एक मोठी ऑर्डर मिळाली होती. ती होती सैफ करिनाची  रिसेप्शन पार्टी. त्या पार्टीत मी वेटर होतो. काही वर्षांनंतर ते काम सोडून मी मॉलमध्ये काम करायलो लागलो. तेव्हाच मी काही ऑडिशन दिल्या आणि जयपूरमध्ये एका थिएटरमध्ये जॉईन झालो. 

आसिफ खानने 'टॉयलेट:एक प्रेम कथा', 'परी', 'पगलेट', 'इंडियाज मोस्ट वाँटेड' सारख्या सिनेमांमध्ये छोटे रोल साकारले आहेत. 2020 साली आलेल्या 'जमतारा' सीरिजने त्याला खरी ओळख दिली. नंतर 'पाताल लोक', 'मिर्झापूर' या सीरिजमध्येही तो दिसला. 

Web Title: Panchayat fame actor Asif Khan worked as waiter at Saif Kareena s reception party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.