'सोनपरी' बनली सिद्धार्थ मल्होत्राची आई; रोहित शेट्टीच्या Indian Police Forceमध्ये मृणाल कुलकर्णींची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 04:57 PM2024-01-23T16:57:23+5:302024-01-23T16:57:50+5:30

रोहित शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्राबरोबर मृणाल कुलकर्णींचा फोटो व्हायरल, नेमकं चाललंय काय?

mrunal kulkarni played siddharth malhotra mother role in rohit shetty indian police force web series | 'सोनपरी' बनली सिद्धार्थ मल्होत्राची आई; रोहित शेट्टीच्या Indian Police Forceमध्ये मृणाल कुलकर्णींची चर्चा

'सोनपरी' बनली सिद्धार्थ मल्होत्राची आई; रोहित शेट्टीच्या Indian Police Forceमध्ये मृणाल कुलकर्णींची चर्चा

९०च्या दशकात 'सोनपरी' बनून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी गोड अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. विविधांगी भूमिका साकारून मृणाल कुलकर्णी यांनी मराठीबरोबरच हिंदीत जम बसवला. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या मृणाल कुलकर्णी आता वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. 

मृणाल कुलकर्णींचा चाहता वर्ग मोठा असून त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच त्या अनेकदा फोटोही शेअर करताना दिसतात. नुकतंच मृणाल कुलकर्णींनी सिद्धार्थ मल्होत्रा आणि रोहित शेट्टीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो पाहून चाहत्यांनाही प्रश्न पडला होता. दरम्यान, रोहित शेट्टीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'इंडियन पोलीस फोर्स' या सीरिजमध्ये मृणाल कुलकर्णी झळकल्या आहेत. या सीरिजमध्ये त्यांनी सिद्धार्थ मल्होत्राच्या आईची भूमिका साकारली आहे. 

'इंडियन पोलीस फोर्स' वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कबीर मलिक ही दिल्ली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर मृणाल कुलकर्णी या त्याच्या आईच्या भूमिकेत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही वेब सीरिज बघण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'इंडियन पोलीस फोर्स' ही वेब सीरिज २० जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये विवेक ओबेरॉय, सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, शरद केळकर, वैद्येही परशुरामे हे कलाकार आहेत. 

Web Title: mrunal kulkarni played siddharth malhotra mother role in rohit shetty indian police force web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.