आम्ही फक्त कलाकार होतो, 'मिर्झापूर'ने स्टार केलं; पंकज त्रिपाठींनी सांगितली मनातली गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 05:00 PM2024-06-24T17:00:46+5:302024-06-24T17:01:12+5:30

'मिर्झापूर 3' लवकरच रिलीज होणार आहे. 'मिर्झापूर' फेम कालिन भैय्या अर्थात पंकज त्रिपाठींनी मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत (mirzapur 3, pankaj tripathi)

mirzapur 3 actor Pankaj Tripathi on how this show has transformed them into stars | आम्ही फक्त कलाकार होतो, 'मिर्झापूर'ने स्टार केलं; पंकज त्रिपाठींनी सांगितली मनातली गोष्ट

आम्ही फक्त कलाकार होतो, 'मिर्झापूर'ने स्टार केलं; पंकज त्रिपाठींनी सांगितली मनातली गोष्ट

 'मिर्झापूर 3' ची उत्सुकता शिगेला आहे. काही दिवसांपुर्वी वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला. आता सर्वजण सीरिज रिलीज व्हायची वाट बघत आहेत.  'मिर्झापूर' च्या आधीच्या सीझनमध्ये अनेक कलाकारांचा ट्रॅक संपला. जसं की कालिन भैय्या चा मुलगा मुन्ना भय्या. त्याचे वडील इत्यादी. दुसऱ्या सीझनच्या अखेरीस गुंडांच्या हल्ल्यापासून कालिन भैय्याचा बचाव होतो. आता तिसऱ्या सीझनमध्ये कालिन भैय्या पुन्हा एकदा 'भौकाल' गाजवायला सज्ज आहे. 'मिर्झापूर'मध्ये कालिन भैय्याची भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठींनी त्यांचं मत व्यक्त केलंय. 

 'मिर्झापूर'बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंकज त्रिपाठी म्हणतात..

 'मिर्झापूर 3' चा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना पंकज त्रिपाठी म्हणतात, "माझ्या करिअरमधलं एक पुढचं पाऊल म्हणून मिर्झापूरकडे मी पाहतो. मिर्झापूर जगप्रसिद्ध होण्याआधी आम्ही फक्त एक कलाकार होतो. मिर्झापूरनंतर आम्ही सर्व स्टार्स झालो. मिर्झापूरचा पहिला सीझन झाल्यानंतर चाहत्यांकडून आणि विशेषतः महिला चाहत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया माझ्यासाठी आश्चर्यकारक होत्या.

पंकज त्रिपाठी पुढे सांगतात, "या प्रतिक्रिया बघता मला कळलं की आजवर भारतीय मनोरंजन विश्वात डॉनची प्रतिमा जशी तयार करण्यात आलीय तसा कालिन भैय्या नाही. इतर माफिया आणि डॉनपेक्षा कालिन भैय्या खूप शांत आहे. तो तत्वनिष्ठ आणि इतरांवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. इतर गुंडांप्रमाणे कालिन भैय्या कायम वेगळा ठरतो. खऱ्या आयुष्यातील माणसांप्रमाणेच कालिन भैय्यामध्येही भावना आहेत." अशाप्रकारे पंकज त्रिपाठींनी 'मिर्झापूर 3'बद्दल कृतज्ञता दर्शवली.

'मिर्झापूर 3' रिलीज कधी होणार?

'मिर्झापूर 3' मध्ये पुन्हा एकदा दिग्गज कलाकारांची फौज दिसतेय. पंकज त्रिपाठीअली फजल, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी,  रसिका डुगल, विजय वर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी 'मिर्झापूर 3' ची निर्मिती केलीय. प्राईम व्हिडीओवर 'मिर्झापूर 3' रिलीज होणार आहे. ५ जुलै २०२४ ला 'मिर्झापूर 3' रिलीज होणार आहे.

 

Web Title: mirzapur 3 actor Pankaj Tripathi on how this show has transformed them into stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.