जबरदस्त सीन्स अन् खिळवून ठेवणारी कथा! OTT वरील 'ही' सीरिज पाहून 'मिर्झापूर' विसराल; कधी, कुठे बघाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:55 IST2025-11-28T17:42:59+5:302025-11-28T17:55:12+5:30
जबरदस्त सीन्स अन् खिळवून ठेवणारी कथा! ओटीटीवरील ही सीरिज पाहून 'मिर्झापूर' विसराल; कधी, कुठे बघाल?

जबरदस्त सीन्स अन् खिळवून ठेवणारी कथा! OTT वरील 'ही' सीरिज पाहून 'मिर्झापूर' विसराल; कधी, कुठे बघाल?
The Family Man: सध्या ओटीटीप्रेमींमध्ये ज्या सीरिजबद्दल चर्चा सुरू असते, त्या यादीत 'फॅमिली मॅन'चं नाव आवर्जून घेतलं जातं,. पहिले दोन सीझन यशस्वी झाल्यानंतर या सीरिजचा तिसरा सीझनही तितकाच गाजतो आहे. फॅमिली मॅन ही सर्वाधिक लोकप्रिय असणारी सीरिज आहे. जवळपास ४ वर्षानंतर या सीरिजचा तिसरा भाग २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘द फॅमिली मॅन’चे दिग्दर्शन राज अँड डीके, सुमन कुमार आणि तुषार सेठ यांनी केले आहे. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके हे या सीरिजचे निर्माते आहेत आणि त्यांनी तिन्ही सीझनची निर्मिती केली आहे.यामधील अॅक्शन आणि पूर्वीपेक्षा धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत आहे, जो देशाची सेवा करतो आणि त्याच वेळी एक प्रेमळ पती आणि वडील म्हणूनही जबाबदाऱ्या पार पाडतो. ही सीरिज ओटीटीप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनली आहे. शिवाय अनेकजण या सीरिजच्या चौथ्या भागाची देखील मागणी करत आहेत.
'द फॅमिली मॅन ३' ही एक अॅक्शन ड्रामा सीरिज आहे जी मध्यमवर्गीय श्रीकांत तिवारीची कहाणी सांगते. त्याचा पहिला सीझन २०१९ मध्ये, दुसरा सीझन २०२१ मध्ये आणि तिसरा सीझन २०२५ मध्ये आला. तिन्हीही हिट ठरले.यामध्ये श्रीकांत तिवारीचा जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळाला, जो पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 'द फॅमिली मॅन ३' च्या सीझनसमोर मिर्झापूर चा तिसरा भाग फिका पडेल. ही सीरिज अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.