ना कोणतीही हिंसा, ना बोल्ड कंटेन्ट; ८ एपिसोडची 'ही' वेब सीरिज 'क्रिमिनल जस्टिस'ला देते टक्कर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:47 IST2025-09-29T16:40:49+5:302025-09-29T16:47:06+5:30
ना कोणतीही हिंसा, ना बोल्ड कंटेन्ट; ८ एपिसोडची 'ही' वेब सीरिज 'क्रिमिनल जस्टिस'ला देते टक्कर!

ना कोणतीही हिंसा, ना बोल्ड कंटेन्ट; ८ एपिसोडची 'ही' वेब सीरिज 'क्रिमिनल जस्टिस'ला देते टक्कर!
OTT Movie: ओटीटीवर सध्या क्राइम थ्रिलर, सस्पेन्स आणि रोमॅन्टिक चित्रपटांची चलती असताना एका चित्रपटाची या डिजीटल प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर जगभरातील वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट उपलब्ध आहेत. अशीच एक वेब सीरिज नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये आहे. ८ एपिसोड असलेल्या या सीरिजमध्ये कोणत्याही बोल्ड किंवा अश्लील कंन्टेटचा भडिमार न करता त्यातील प्रत्येक भावना आणि साधेपणा दाखवण्यात आला आहे. या सीरिजचं नाव मामला लीगल है असं आहे.
'मामला लीगल है' या ८ एपिसोड असलेल्या कोर्टरुम ड्रामामध्ये रवी किशन आणि अनंत जोशी, निधी बिष्ट, नैना ग्रेवाल तसेच तन्वी आझमी, यशपाल शर्मा या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. नेटफ्लिक्सवरील या कोर्टरूम ड्रामा सीरिजमध्ये असे अनेक विचित्र प्रसंग समोर येतात, जे पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही.या सीरिजमध्ये दिल्लीतील पटपडगंज परिसरातील न्यायालयाची कथा दाखवण्यात आली आहे. अभिनेते रवी किशन यांनी सीरिजमध्ये वीडी त्यागी नावाच्या वकिलाची भूमिका साकारली आहे.
'मामला लीगल है' ही बहुचर्चित वेब सीरिज २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजचं दिग्दर्शन राहुल पांडे यांनी केलं आहे. ८ एपिसोडच्या या सीरिजला ओटीटीवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.