किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:38 IST2025-11-21T13:38:15+5:302025-11-21T13:38:52+5:30
माधुरीच्या एक्सप्रेशनने वाढवलं गूढ, बघा टीझर

किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित आगामी सीरिज 'मिसेस देशपांडे'मुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये माधुरी सीरियल किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच माधुरी अशी भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत मराठी अभिनेतासिद्धार्थ चांदेकरही आहे. नागेश कुकनूर यांनी सीरिज दिग्दर्शित केली आहे. दोन दिवसांपूर्वीच सीरिजचा फर्स्ट लूक आला होता. तर आता सीरिजचा आणखी एक टीझर समोर आला आहे. यातही माधुरीच्या किलर एक्सप्रेशनने लक्ष वेधून घेतलं आहे.
टीझरच्या सुरुवातीला माधुरी दीक्षित टेबलवर बसून काकडी, गाजर चिरताना दिसत आहे. यासोबत ती 'भोली सी सुरत' गाणं गुणगुणत आहे. मध्येच रेडिओवर बातमी ऐकू येते की, 'मर्डर केसमध्ये आतापर्यंत ८ खूनांनंतरही आरोपीची काहीच माहिती नाही. पोलिसांचा तपास अजूनही सुरुच आहे'. यानंतर माधुरी चालाख एक्सप्रेशन देते. तिच्या चेहऱ्यावर वेगळंच हसूही असतं. पुन्हा ती गाणं गुणगुणायला लागते. माधुरीचा हा टीझर पाहून चाहत्यांना सीरिजबद्दल आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. यासोबत सीरिजची रिलीज डेटही घोषित करण्यात आली आहे. १९ डिसेंबर रोजी सीरिज हॉटस्टारवर रिलीज होत आहे.
किलर स्माईल ते किलर्स स्माईल असं कॅप्शन हॉटस्टारने दिलं आहे. आतापर्यंत चाहते माधुरीच्या किलर स्माईलवर भाळत होते. ते आता माधुरीला किलरच्या भूमिकेत पाहाण्यासाठी उत्सुक आहेत. सीरिजमध्ये माधुरी, सिद्धार्थ चांदेकर, प्रियांशू चॅटर्जी, दीक्षा जुनेजा, प्रदीप वेलणकर यांचीही भूमिका आहे.