हुमा कुरेशीच्या 'महाराणी-3' पॉलिटिकल थ्रिलर ड्रामाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 07:59 PM2024-02-19T19:59:52+5:302024-02-19T20:03:58+5:30

हुमा कुरेशी स्टारर 'महाराणी 3' या पॉलिटिकल थ्रिलर वेब सिरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 

Huma Qureshi's Maharani 3 Trailer ReleaseWeb Series Will Streaming On 7th March | हुमा कुरेशीच्या 'महाराणी-3' पॉलिटिकल थ्रिलर ड्रामाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

हुमा कुरेशीच्या 'महा राणी-3' चा पॉलिटिकल थ्रिलर ड्रामाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

अभिनेत्री हुमा कुरेशी ही नेहमीच तिच्या स्टाईल अन् लूकसाठी ओळखली जाणारी बॉलीवूडची सेलिब्रेटी आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या हटक्या भूमिकासांठी हुमा ही नेहमीच चर्चेत राहिली आहे. हुमाची महाराणी वेबसीरिजच्या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हुमा कुरेशी स्टारर 'महाराणी 3' या पॉलिटिकल थ्रिलर वेब सिरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 

 महाराणी वेब सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. आता तिसरा सीझन येत आहे. ट्रेलरची सुरुवात ही राणी भारती म्हणजेच हुमा कुरेशीपासून सुरू होते. ट्रेलरमध्ये राणी भारती ही पती माजी मुख्यमंत्री भीमा भारतीच्या हत्येचा आरोपात तुरुंगात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आता ती अशिक्षित नसून तिच्या हातात पुस्तक पाहायला मिळत आहे.  'कमजोर लोक बंदुका वापरतात, बुद्धिमान लोक त्यांच्या मेंदूचा वापर करतात, असा संवाद या ट्रेलरच्या अखेरीस आहे. 

बिहारच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या वेब सीरिजमध्ये हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेत आहे.  ट्रेलरमधील हुमाच्या लूकला प्रेक्षकांची पसंतीदेखील मिळत आहे. साधी कॉटनची साडी, मोठी टिकली असा हुमाचा ट्रेलरमधील टीपिकल लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. महाराणीच्या तिसऱ्या सीझनचे दिग्दर्शन सौरभ भावे याने केले आहे. सुभाष कपूर आणि नंदन सिंह यांनी लेखन केले आहे. महाराणी-3 वेब सीरिज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  7 मार्च पासून ही वेबी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Huma Qureshi's Maharani 3 Trailer ReleaseWeb Series Will Streaming On 7th March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.