सस्पेन्स, थ्रिलर अन् हॉररने उडेल थरकाप; 'हा' सिनेमा एकट्यात बघण्याची हिंमतच होणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:33 IST2025-09-22T16:21:35+5:302025-09-22T16:33:03+5:30

सस्पेन्स, थ्रिलर अन् हॉररने उडेल थरकाप, 'हा' हॉरर सिनेमा ओटीटीर आहे ट्रेंडिंग, तुम्ही पाहिलात का?

bloody ishq 2024 best horror film give goosebumps now trending on ott starrer avika gor | सस्पेन्स, थ्रिलर अन् हॉररने उडेल थरकाप; 'हा' सिनेमा एकट्यात बघण्याची हिंमतच होणार नाही!

सस्पेन्स, थ्रिलर अन् हॉररने उडेल थरकाप; 'हा' सिनेमा एकट्यात बघण्याची हिंमतच होणार नाही!

Ott Movie: गेल्या काही वर्षांपासून अॅक्शन आणि रोम-कॉम चित्रपटांसह हॉरर सिनेमांनाही प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळताना दिसते आहे. हॉरर चित्रपटांची मजा वेगळीच असते.पण काही चित्रपट इतके भीतीदायक असतात की ते एकट्याने पाहणे जवळजवळ अशक्य वाटतं. असाच एक हॉरर सिनेमा पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 'ब्लडी इश्क' असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही. मात्र, ओटीटीवर रिलीज होताच त्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.

'ब्लडी इश्क' या चित्रपट हॉटस्टारवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री अविका गौर , वर्धन पुरी, जेनिफर पिकिनाटो, श्याम किशोर, कोरल भामरा आणि अर्शिन मेहता यांच्या भूमिका आहेत.या चित्रपटाची कथा एका मुलीभोवती फिरते जी एका अपघातानंतर तिचा स्मृतीभ्रंश होतो. त्यानंतर ती तिच्या पतीसोबत एका बेटावर राहायला जाते.जिथे तिच्यासोबत विचित्र घटना घडतात. या चित्रपटातील सस्पेन्स खिळवून ठेवणारा आहे. हा चित्रपट पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं होतं.

'ब्लडी इश्क'चित्रपट गतवर्षी २०२४ मध्ये प्रदर्शित झाला आहे. या हॉरर चित्रपटात खूप भयानक दृश्ये दाखवण्यात आली आहेत.हा चित्रपट सिनेप्रेमींना आता घरबसल्या पाहता येणार आहे.

Web Title: bloody ishq 2024 best horror film give goosebumps now trending on ott starrer avika gor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.