विराट तू अजिबात दाढी काढायची नाही! अनुष्काचा प्रेमळ सल्ला

By Admin | Updated: April 25, 2017 12:38 IST2017-04-25T12:36:14+5:302017-04-25T12:38:40+5:30

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी नेहमीच चर्चेत असते.

Virat, you do not want to take a beard! Anushka's loving advice | विराट तू अजिबात दाढी काढायची नाही! अनुष्काचा प्रेमळ सल्ला

विराट तू अजिबात दाढी काढायची नाही! अनुष्काचा प्रेमळ सल्ला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी नेहमीच चर्चेत असते. विराट आणि अनुष्का एकत्र आले आणि मीडियात त्याची चर्चा झाली नाही, असं कधीच झाले नाही. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चेलाही उधाण आलं होतं. मात्र त्यांच्यामध्ये लग्नाआधीच पती-पत्नीसारख्या अलवार भांडणाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी दाढी वाढवायचाही क्रिकेटपटूंमध्ये एक ट्रेंड सुरू होता. त्यामुळे अनेक क्रिकेटपटू स्टायलिश आणि आकर्षक दाढी ठेवत होते.

वेगवान फलंदाज असलेला विराट कोहलीलाही या ट्रेंडनं भुरळ घातली होती. विराटनेही दाढी वाढवली आणि त्याची दाढी चर्चेचा विषय ठरत गेली. मात्र आता दाढी काढण्याचा नवाच ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी स्वतःची दाढी काढली आहे. त्यावेळी विराट कोहलीनंही त्यांनाही दाढी काढणार नसल्याचं सांगितलं आहे. विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर रवींद्र जाडेजा, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना टॅग करत कमेंट लिहिली की, सॉरी बॉस सध्या मी दाढी काढण्यासाठी उत्सुक नाही, पण तुमचा मेकओव्हर चांगला आहे. विराटचही ही इन्स्टाग्राम पोस्ट वाचताच अनुष्का शर्माने विराट कोहलीला सल्लावजा आदेश दिला आहे.

विराट तू दाढी अजिबात काढू शकत नाहीस, त्यानंतर विराटनेही तातडीने इन्स्टाग्रामवरच ओके असं अनुष्काला उत्तर दिलं आहे. या दोघांमध्ये ब-याचदा इन्स्टाग्रामवरही संभाषण होत असतं. विराट कोहलीच्या या फोटोला इन्स्टाग्रामवर जवळपास 8 लाख लाईक्स मिळाले आहेत, तर 9 हजार लोकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत, ज्यामध्ये अनुष्का शर्माचाही समावेश आहे.

Web Title: Virat, you do not want to take a beard! Anushka's loving advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.