विजय, राहुल आणि प्रेम..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:44 IST2016-01-16T01:19:49+5:302016-02-07T13:44:40+5:30

असे म्हणतात की, नावात काय ठेवले आहे?मात्र नावाच्या शक्तीला कुणी नाकारू शकत नाही. 'शोले'ने अमजद खानला नेहमीसाठी गब्बर बनवून ...

Vijay, Rahul and Prem .. | विजय, राहुल आणि प्रेम..

विजय, राहुल आणि प्रेम..

े म्हणतात की, नावात काय ठेवले आहे?मात्र नावाच्या शक्तीला कुणी नाकारू शकत नाही. 'शोले'ने अमजद खानला नेहमीसाठी गब्बर बनवून टाकले. बॉलिवूडच्या इतिहासात अशा अनेक भूमिकांचे नावं आहे, जे कलाकारांच्या ओळखीसोबत जोडल्या गेले. अमिताभ बच्चनला विजय, सलमान खानला प्रेम आणि शाहरुख खानला राहुल नावासोबतच्या भूमिकांमुळे मोठे यश मिळाले.

राजश्रीच्या बॅनरमध्ये सूरज बडजात्या यांचा 'प्रेम रतन धन पायो'मध्ये सलमान खान पुन्हा एकदा प्रेम बनून पडद्यावर येत आहे. असेही म्हणता येईल की, सलमान खानच्या प्रेम अवतारला सूरज यांनीच १९८९मध्ये 'मैंने प्यार किया'मध्ये जन्म दिला होता. त्यानंतर सूरज यांनीच 'हम आपके हैं कौन', 'हम साथ साथ है'मध्ये सलमानला प्रेम म्हणूनच पडद्यावर आणले होते.

सूरज यांच्या चित्रपटांव्यतीरिक्त पाहिले तर सलमान खानने दुसर्‍या अनेक चित्रपटांमध्येदेखील प्रेमची भूमिका केली आणि याला योगायोगच म्हणावा लागेल की ज्या चित्रपचटांमध्ये तो प्रेम बनलाय. त्यातील बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. त्यामध्ये राजकुमार संतोषी यांचा 'अंदाज अपना अपना', डेविड धवन यांचा 'साथ चल मेरे भाई', 'जुडवा', 'पार्टनर' आणि 'बीवी नंबर वन', अनीस बज्मीेसोबत 'नो एंट्री' आणि 'रेडी' यांचे प्रमुख नाव आहे. 'मैरीगोल्ड', 'कहीं प्यार न हो जाए' चित्रपटातदेखील सलमानच्या भूमिकांचे नाव प्रेम राहिले आहे.

सलमान खानच्या चित्रपट यशामध्ये जर प्रेमचे अद्भूत योगदान राहिले आहे, तर कोण विसरू शकते की कसे विजयच्या भूमिकांनी अमिताभ बच्चन यांना महानायक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका वठवली. अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा प्रकाश मेहरा यांच्या 'जंजीर'मध्ये विजय नाव मिळाले आणि प्रथमच बच्चन यांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले होते. त्यानंतर विजय यशाच्या मार्गावर पुढे निघून गेला. यश चोपडाच होते ज्यांनी शाहरुख खानला प्रथमच राहुल नाव दिले तो चित्रपट होता 'डर'. या चित्रपटाने राहुलसोबत शाहरुखला जसे बांधूनच ठेवले.

'डर' नंतर यश चोपडा यांनी 'दिल तो पागल है'मध्ये त्याला पुन्हा राहुल बनविले, तर करण जाैहर यांनी तर 'कुछ कुछ होता है' पासून 'कभी खुशी कभी गम'पर्यंत शाहरुखला राहुल बनविले. इतकेच नव्हे शाहरुखने आपल्या स्वत:ची निर्मिती असलेल्या 'चेन्नई एक्सप्रेस'मध्येही राहुलची भूमिका केली. अजीज मिर्झा यांच्या 'यस बॉस'मध्येही शाहरुखचे नाव राहुल होते. 

Web Title: Vijay, Rahul and Prem ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.