"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 16:04 IST2025-04-27T16:03:55+5:302025-04-27T16:04:09+5:30

विजय देवरकोंडानं पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पाकिस्तानला सुनावलं.

Vijay Deverakonda React To Pahalgam Terror Attack Slams Pakistan Says Kashmir Belongs To India | "एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

Vijay Deverakonda React To Pahalgam Terror Attack: पहलगाममधील हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे.  २८ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. प्रत्येक क्षेत्रातून पहलगाम हल्ल्याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेक कलाकारांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. आपल्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखला जाणारा अभिनेता विजय देवरकोंडानं (Vijay Deverakonda) पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पाकिस्तानला सुनावलं.

विजय देवरकोंडा नुकतंच अभिनेता सूर्याच्या आगामी 'रेट्रो' चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात हजेरी (Vijay Deverakonda Attends Suriya's "Retro" Pre-release Event) लावली. यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल तो बोलताना दिसला. विजयनं हल्ल्यात ठार झालेल्या निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं. यासोबतच त्यानं पाकिस्तानातील लोकांना चांगल्या शिक्षणाची गरज असल्याचं म्हटलं. विजय म्हणाला, "काश्मीरमध्ये ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत, त्या पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. पाकिस्तानी लोकांना शिक्षण आणि ज्ञानाची आवश्यकता आहे.  जेणेकरून ते योग्य आणि अयोग्य समजू शकतील आणि कोणताही दहशतवादी त्यांचं ब्रेनवॉश करू शकणार नाही".

पुढे तो म्हणाला, "जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीर भारताचं आहे आणि काश्मिरी देखील भारताचे आहेत. त्याबद्दल कोणताही वाद नसावा. मी दोन वर्षांपूर्वी तिथे शूटिंगसाठी गेलो होतो. त्यांनी आमची खूप चांगली काळजी घेतली. मला वाटतं भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याची गरज नाही. पाकिस्तान स्वतःचा देश सांभाळू शकत नाहीत. त्यांच्याकडे वीज आणि पाणी सारख्या आवश्यक गोष्टी नाहीत आणि ते आपल्याशी काय युद्ध लढतील? काही दिवसांनी तिथलेच लोक पाकिस्तानविरुद्ध बंड करतील", असं अभिनेत्यानं म्हटलं. यासोबत "आपण सर्वांनी एकजूट असले पाहिजे. आपण एकमेकांवर प्रेम करायला शिकले पाहिजे", असंही विजय देवरकोंडानं म्हटलं.
 

Web Title: Vijay Deverakonda React To Pahalgam Terror Attack Slams Pakistan Says Kashmir Belongs To India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.