विद्या बालनच्या 'कहानी 2' चा ट्रेलर रिलीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 19:26 IST2016-10-25T17:57:09+5:302016-10-25T19:26:57+5:30

दिग्दर्शक सुजॉय घोष आणि विद्या बालन यांच्या कहानी चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहताय ना? मग आता तुमची प्रतीक्षा संपलीय.

Vidya Balan's 'Story 2' trailer release | विद्या बालनच्या 'कहानी 2' चा ट्रेलर रिलीज

विद्या बालनच्या 'कहानी 2' चा ट्रेलर रिलीज

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 -  दिग्दर्शक सुजॉय घोष आणि विद्या बालन यांच्या कहानी चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहताय ना? मग आता तुमची प्रतीक्षा संपलीय. विद्याचा कहानी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनय पाहता सिक्वेलमधील तिची भूमिका कशी असेल? याविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. आज या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. यात विद्या बालन ही दुर्गा रानी सिंग हिच्या भूमिकेत आहे तर अर्जुन रामपाल पोलीसाच्या भुमिकेत झळकणार आहे. २५ नोव्हेबंर २०१६ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होईल. 
 
ट्रेलर सुरू होताच विद्या बालनला एक फोन येतो. तिची मुलगी मिम्मीचे अपहरण केल्याचे तिला कळते. घाईगडबडीत जाणाऱ्या विद्याचा कारला धडकून अपघात होतो आणि ती कोमामध्ये जाते. नंतर उलगडा होतो की, ती लहान मुलांचे किडनॅपिंग करून त्यांचा खुन करणारी दुर्गा रानी सिंग असते आणि कथानक पुढे सरकते. आता चित्रपटाच्या शेवटी कोणकोणत्या घटनांची उकल होते हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. चित्रपटातील खरा हीरो हे त्याचे कथानक आहे, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात काय तर ह्यकहानी २ म्हणजे एक थ्रिलिंग राईड आहे.
 
 
२०१२ मध्ये आलेल्या सस्पेन्स थ्रिलर 'कहानी' चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. कहानी चित्रपटात विद्या बालनने एका गरोदर महिलेची भुमिका निभावली होती. ज्यामध्ये विद्या आपल्या पतीच्या शोधात लंडनहून कोलकातामध्ये येते. विद्या बालनची ही भुमिका प्रेक्षकांना खुपच आवडली होती. विद्याला या चित्रपटासाठी अनेक अॅवॉर्डदेखील मिळाले होते. दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी कहानी चित्रपटाची कथा लिहिली होती तसंच दिग्दर्शनही केलं होतं. या चित्रपटात विद्या बालनने प्रमुख भुमिका निभावली होती तर नवाझुद्दीन सिद्दीकी, इंद्रनील सेनगुप्ता, सास्वता चॅटर्जी यांनीदेखील महत्वाच्या व्यकिरेखा साकारल्या होत्या. 
 

 

Web Title: Vidya Balan's 'Story 2' trailer release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.