"ही भूमिका करण्याची ताकद नाही...", विद्या बालनने सलमान, शाहरूख, आमिरला दिलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 09:54 AM2024-04-26T09:54:10+5:302024-04-26T09:54:40+5:30

Vidya Balan : अभिनेत्री विद्या बालनने बॉलिवूडच्या खानांना जबरदस्त आव्हान दिलं आहे. कोणत्याही मोठ्या स्टारमध्ये, विशेषत: खानमध्ये अशी भूमिका करण्याची ताकद नसल्याचे तिने म्हटले आहे.

Vidya Balan had challenged Salman Khan, Shah Rukh Khan, Aamir Khan, "I don't have the strength to do this role..." | "ही भूमिका करण्याची ताकद नाही...", विद्या बालनने सलमान, शाहरूख, आमिरला दिलं आव्हान

"ही भूमिका करण्याची ताकद नाही...", विद्या बालनने सलमान, शाहरूख, आमिरला दिलं आव्हान

बॉलिवूडची उलाला गर्ल विद्या बालन(Vidya Balan)ने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'द डर्टी पिक्चर'मधून फिल्मी दुनियेत आपला ठसा उमटवणाऱ्या विद्या बालनने अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. मात्र, सध्या ती तिच्या कोणत्याही चित्रपटासाठी नाही तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. विद्या बालनने बॉलिवूडच्या खानांना जबरदस्त आव्हान दिलं आहे. बॉलीवूडमधील कोणत्याही मोठ्या स्टारमध्ये, विशेषत: खानमध्ये 'गे' भूमिका साकारण्याची ताकद नाही, असे तिने म्हटले आहे.

अनफिल्टर्ड विथ समदीश या पॉडकास्ट शोमध्ये आलेल्या विद्या बालनने अनेक गोष्टींबद्दल सांगितले. यादरम्यान विद्या बालन समलिंगी पात्रांबद्दल बोलली. विद्या बालन म्हणाली, 'केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे हे सत्य स्वीकारावे लागेल. हा फार मोठा फरक म्हणता येईल. मी मामूटीकडून त्यांच्या कामाचे श्रेय घेत नाही, परंतु त्यांनी कैथल: द कोअरमध्ये साकारलेले पात्र तिथे साकारणे सोपे आहे. हा त्यांच्या समाजाचा आरसा आहे. मला वाटतं, अशी पात्रं तिथे सहज साकारता येतात आणि लोकही त्यांना स्वीकारतात.

दक्षिणेत लोक सेलिब्रिटींची करतात पूजा
विद्या बालन पुढे म्हणते, 'दाक्षिणात्य लोक त्यांच्या कलाकारांचा खूप आदर करतात, त्यांची पूजा करतात. कदाचित त्यामुळेच त्याने ही व्यक्तिरेखा खूप छान साकारली असावी. त्याचा आपल्या पुरुषत्वावर काय परिणाम होईल याचा अजिबात विचार केला नाही. विद्या म्हणाली, 'मला वाटत नाही की आमचा कोणताही मोठा स्टार कैथलसारखा चित्रपट करू शकेल, खासकरून खान पिढी.'

कैथल पाहिल्यानंतर दुलकर सलमानला केला मेसेज
विद्या बालन म्हणाली, 'जेव्हा मी कैथल पाहिला तेव्हा मी दुलकर सलमानला त्याच्या सुपरस्टार वडिलांची प्रशंसा करण्यासाठी मेसेज केला. मल्याळम सिनेमातील बड्या सुपरस्टारने यात केवळ अभिनयच केला नाही तर त्याची निर्मितीही केली. याशिवाय विद्या बालननेही आयुषमान खुरानाच्या वेगळ्या भूमिकेसाठी त्याचे कौतुक केले.

Web Title: Vidya Balan had challenged Salman Khan, Shah Rukh Khan, Aamir Khan, "I don't have the strength to do this role..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.