Maharashtrachi Hasya Jatra | महाराष्ट्राची हास्य जत्रा रिहर्सल अन् दिग्दर्शकांसोबत ओंकारचा धमाल BTS
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 17:03 IST2021-11-11T17:02:59+5:302021-11-11T17:03:15+5:30
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा विनोदी कार्यक्रमात कलाकार वेगवेगळे स्किट साकारत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात. प्रेक्षकांना हसवण्यासाठी हास्य जत्राची टिम दिवस रात्र मेहनत घेत असते. प्रेक्षकांना हा कार्यक्रम खूपच आवडतो. मात्र तुम्हाला माहितीये का एक स्किट जेव्हा आपल्या समोर येत तेव्हा त्यासाठी कलाकार किती मेहनत घेतात ते. नुकताच एक रिहर्सल करतानाचा बीटीएस व्हिडीओ या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओ ते अभिनेता ओंकार भोजनेला याला एका स्किटचं सादरीकरण कसं करावं हे समजावून सांगताना दिसतायेत. पाहूयात ओंकारचा दिग्दर्शकांसोबतचा हा बीटीएस व्हिडीओ...