इरफान खानला न्युरो एंडोक्राइन ट्युमर, नेमका काय आहे हा दुर्धर आजार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 20:25 IST2018-03-16T20:25:03+5:302018-03-16T20:25:47+5:30
मुंबई - इरफान खान गेले काही दिवस आजारी आहे. स्वत: इरफानने दुर्धर आजार झाल्याची माहिती ट्विटद्वारे उघड केली होती. ...
मुंबई - इरफान खान गेले काही दिवस आजारी आहे. स्वत: इरफानने दुर्धर आजार झाल्याची माहिती ट्विटद्वारे उघड केली होती. आता त्याने तो आजार न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर असल्याचे सांगितलं आहे. इरफानला झालेला आजार न्युरो एंडोक्राइन ट्युमर हा नावामुळे वाटतो तसा मेंदूशी संबंधित असलाच पाहिजे असं नाही. हा आजार पचन ग्रंथींशी संबंधित आहे. त्याच्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. तो आतड्यात, मलाशयात उद्भवू शकतो. या आजारात एंडोक्राइन कोशिकांची वाढ होऊन शरीरात अन्यत्र पसरतो.