घरातील प्लास्टिकच्या पिशव्यांची चिंता सोडा; अभिनेते योगेश सोमण सांगताहेत 'आयडियाची कल्पना'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 12:42 IST2018-06-25T12:42:43+5:302018-06-25T12:42:59+5:30
लेखक, अभिनेते योगेश सोमण ह्यांनी प्लॅस्टिक बंदीवर खुमासदारपणे भाष्य केले आहे. घरात राहिलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर त्यांनी बनियनसारखा करण्याचा ...
लेखक, अभिनेते योगेश सोमण ह्यांनी प्लॅस्टिक बंदीवर खुमासदारपणे भाष्य केले आहे. घरात राहिलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर त्यांनी बनियनसारखा करण्याचा सल्ला समस्त पुरुष वर्गाला दिला आहे. त्या प्लॅस्टिक पिशवीचा बनियन कसा करावा ह्याचं प्रात्यक्षिकही सोमण ह्यांनी या व्हिडीओमध्ये दाखवले आहे. प्लॅस्टिक बंदीवर लावण्यात आलेल्या अवाजवी दंडाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना काही बदल सुचवले आहेत. दंडाची अवास्तव रक्कम एकतर 50 ते 100 रुपयांवर आणा. आणि एका पिशविसाठी मी अजिबात 5000 रुपये दंड देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.