सेक्स वर्करची बाजू मांडणार विभावरी देशपांडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 15:56 IST2016-12-14T18:35:32+5:302016-12-20T15:56:02+5:30
बेनझीर जमादार अभिनेत्री विभावरी देशपांडेने मराठी चित्रपटसृष्ट्रीला 'नटरंग', 'सातच्या आत घरात', 'श्वास', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'बालगंधर्व' असे एक से बढकर ...
सेक्स वर्करची बाजू मांडणार विभावरी देशपांडे
बेनझीर जमादार
अभिनेत्री विभावरी देशपांडेने मराठी चित्रपटसृष्ट्रीला 'नटरंग', 'सातच्या आत घरात', 'श्वास', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'बालगंधर्व' असे एक से बढकर एक चित्रपट दिले आहेत. आता ही अभिनेत्री बॉलिवूडच्या आदित्य कृपलानी दिग्दर्शित 'टिकली अॅण्ड लक्ष्मी बाँम्ब' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत या चित्रपटात बॉलिवूडची तगडी कलाकार स्वरा भास्कर असणार आहे. याचनिमित्ताने आगामी बॉलिवूड चित्रपटाविषयी विभावरीने लोकमत सीएनएक्सशी साधलेला हा मनमोकळा संवाद.
1. तुझ्या अनेक मराठी सिनेमांनी रसिकांवर छाप पाडली आहे? आता तुझ्या आगामी बॉलिवूड चित्रपटाविषयी जाणून घ्याला आवडेल?
- माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मराठी असो या बॉलिवूड प्रत्येक चित्रपटासाठी मी नेहमीच उत्सुक असते. बॉलिवूड हा एक त्याचा भाग आहे. हिंदी चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग आहे त्यामुळे हे चित्रपट जास्त लोकांपर्यत पोहोचत असतात. तसेच माझा आगामी सिनेमा हा बॉलिवूड चित्रपट असण्यापेक्षा त्याचा आशय खूप ताकदीचा आहे त्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला. जर हा मराठी चित्रपट असला असता तरीही मला तितकाच आनंद झाला असता. कारण माध्यम एकच आहे फक्त भाषा वेगळ्या आहेत. त्याला मिळणारा प्रेक्षकवर्ग हा मोठा आहे. इतकाच काय तो फरक आहे. तसे मराठी चित्रपट किंवा बॉलिवू़ड चित्रपट कलाकरासांठी दोन्ही समान असतात.
2. या चित्रपटात तू वेश्येची भूमिका साकारणार आहे याविषयी तूझे मत काय?
- सगळ्यांत आधी सांगायला आवडेल, चित्रपटात वेश्येच्या आयुष्यावर भाष्य करण्यात आले नाहीय. मुळात या व्यवसायात स्त्रियांनी एकत्रित येऊन पुरूषप्रधान संस्कृतीला धुडकावून लावले आहे अशा आशयाचा हा सिनेमा असणार आहे. नेहमी वेश्या म्हटले की, आपल्यासमोर टिपीकल चित्र उभे राहते त्यामुळे या चित्रपटाचा विषय नेहमीच्या साचेबद्ध पद्धतीतला नसून वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. हा विषय रूपेरी पडद्यावर पाहणे इंटरेस्ंिटग असणार आहे.
3. समाजात वेश्येचे स्थान अजून स्वीकारले गेले नाही याविषयी तू काय सांगशील?
- मला निश्चित असं वाटतं की, वेश्या आहे यापेक्षाही त्यापलीकडे जाऊन ती एक स्त्री आहे. तिला स्वत:चा एक सन्मान आहे. तिने स्वत: हे क्षेत्र निवडले नाही. ती समाजाचा एकच भाग आहे. किंबहुना समाजातील अनेक घटकांची गरज म्हणून त्या वेश्या बनतात. स्त्री आणि माणूस म्हणून त्यांना तो आदर समाजात मिळाला पाहिजे. तो या चित्रपटातून वेगळ्या पद्धतीने समोर येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट आणि यातील भूमिका ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची वाटते.
4. या चित्रपटात तू स्वरा भास्करसोबत झळकणार असल्याने काय वाटते?
- मी तनू वेड्स मनू, रांजणा या चित्रपटातील स्वराचे काम पाहिले होते. तिचे या चित्रपटातील काम मला फार आवडले होते. तसेच असं एक असतं की, एखाद्याचे काम पाहिले की, आयुष्यात अशा व्यक्तीशी चांगले कनेक्ट होऊ शकतो. तसेच ती अत्यंत हुशार असून, तिचे वाचनदेखील भरपूर आहे. त्यामुळे अशा हुशार व्यक्तीसोबत काम करणे आव्हानात्मक असले तरी मला तिच्यासोबत काम करण्याची अधिक उत्सुकतादेखील आहे.
5. तू नाटक, मालिका आणि चित्रपट केले आहेत मात्र यामधील कोणते माध्यम तुला अधिक जवळचे वाटते?
- सगळीच माध्यमं मला जवळची वाटतात. खरं सांगू का, कलाकाराला आपल्या कला सादर करण्यासाठी वेगवेगळ््या माध्यमांचे पर्याय उपलब्ध असतात. मात्र एक कलाकार म्हणून प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ््या माध्यमासाठी वेगवेगळे स्कील्सही वापरावे लागतात. मी रंगभूमीवरूनच आल्याने मला रंगभूमी अधिक जवळची वाटते असे म्हणण्यास हरकत नाही. मात्र चित्रपटातदेखील काम करायला मला खूपच आवडते.