ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी यांना पितृशोक, भावुक पोस्ट लिहून अभिनेत्रीने वडिलांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:21 IST2025-07-03T09:19:50+5:302025-07-03T09:21:56+5:30

राम तेरी गंगा मैली फेम प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मंदाकिनी यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालंय

Veteran actress Mandakini mourns her father's death actress pays tribute to her father by writing an emotional post | ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी यांना पितृशोक, भावुक पोस्ट लिहून अभिनेत्रीने वडिलांना वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी यांना पितृशोक, भावुक पोस्ट लिहून अभिनेत्रीने वडिलांना वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मंदाकिनी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. मंदाकिनी यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा एक जुना फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. मंदाकिनी यांच्या करिअरमध्ये त्यांच्या वडिलांचा खूप सपोर्ट होता. 

मंदाकिनी यांची वडिलांसाठी भावुक पोस्ट

वडिलांचा फोटो शेअर करुन पोस्टमध्ये मंदाकिनी लिहितात, “आज सकाळी माझे वडील मला कायमचे सोडून गेले. माझे हृदय तुटले आहे. पप्पा, तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मी सदैव ऋणी राहीन. तू नेहमी माझ्या हृदयात जिवंत राहशील.” त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी मंदाकिनी यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.


कोण होते मंदाकिनी यांचे वडील

मंदाकिनी यांचा जन्म यास्मीन जोसेफ या नावाने झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव जोसेफ असून ते ब्रिटीश वंशाचे होते. मंदाकिनी यांनी १९८५ मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ या राज कपूर दिग्दर्शित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि मंदाकिनी रातोरात स्टार बनली. त्यानंतर त्यांनी ‘डान्स डान्स’, ‘तेजाब’, ‘प्यार करके देखो’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले. या सर्व काळात मंदाकिनीच्या वडिलांनी त्यांना खूप सपोर्ट केला. काही काळानंतर मंदाकिनी यांनी सिनेसृष्टीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी डॉ. काग्युर टी. रिनपोचे ठाकूर यांच्याशी विवाह केला. मंदाकिनी यांना दोन मुलं आहेत. 

Web Title: Veteran actress Mandakini mourns her father's death actress pays tribute to her father by writing an emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.