उषा नाडकर्णी पोहोचल्या अंकिता लोखंडेच्या घरी! अभिनेत्री पती विकीला म्हणाली, "माझ्या पहिल्या सासूबाई..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:32 IST2025-06-03T10:32:28+5:302025-06-03T10:32:56+5:30

नुकतंच उषा नाडकर्णी अंकिता लोखंडेच्या घरी पोहोचल्या होत्या. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Usha Nadkarni At Ankita Lokhande Mumbai Residence Celebrated The 16th Anniversary Of Pavitra Rishta Show | उषा नाडकर्णी पोहोचल्या अंकिता लोखंडेच्या घरी! अभिनेत्री पती विकीला म्हणाली, "माझ्या पहिल्या सासूबाई..."

उषा नाडकर्णी पोहोचल्या अंकिता लोखंडेच्या घरी! अभिनेत्री पती विकीला म्हणाली, "माझ्या पहिल्या सासूबाई..."

Ankita Lokhande Met Usha Nadkarni : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. या मालिकेला काल १ जून रोजी १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेतील अर्चना आणि मानव या जोडीला प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रेम दिलं. अर्चना आणि मानव म्हटलं की आठवतात अर्चनाच्या सासूबाई अर्थात दिग्गज अभिनेत्री उषा नाडकर्णी. मालिकेला १६ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्तानं अंकितानं आपल्या घरी ऑनस्क्रीन सासूबाई, म्हणजेच उषा नाडकर्णी यांना बोलावलं होतं. या खास भेटीत दोघींनी गप्पा मारल्या, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि प्रेमाने एकमेकींना मिठी मारली. अंकिता या खास दिवशी 'पवित्र रिश्ता'मधील अर्चनाच्या लूकमध्ये सजली होती. 

अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांच्या भेटीचा खास व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ऑनस्क्रीन सासू-सूनचं हे नातं आजही तेवढंच जिव्हाळ्याचं आणि प्रेमळ असल्याचं चाहत्यांना पाहायला मिळालं आहे. उषा नाडकर्णींना पाहताच अंकिता म्हणाली, "माझ्या पहिल्या सासूबाई". यानंतर अंकिताने प्रेमाने त्यांना जवळ घेतलं. दोघींनी एकमेकींना मिठी मारली. या गेट-टुगेदरमध्ये विकी जैन आणि अंकिताची आईही उपस्थित होती. 

उषा नाडकर्णी ७९ वर्षांच्या असूनही काम करतात, इंडस्ट्रीत सक्रीय आहेत, याचं अंकितानं कौतुक केलं.  यावेळी अंकिताशी बोलताना उषा नाडकर्णी या खूप भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या वर्षी भावाचं निधन झाल्यानंतर आता त्या एकट्याच राहतात, असं त्यांनी सांगितलं. हे ऐकताच अंकिताने त्यांना जवळ घेतलं आणि आधार दिला. यावेळी अंकिता ही उषा नाडकर्णी यांना 'आई' म्हणूनच हाक मारताना दिसून आली. अंकिता म्हणाली, "आईला आवडतं म्हणून झणझणीत तिखट जेवण केलं आहे". 

Web Title: Usha Nadkarni At Ankita Lokhande Mumbai Residence Celebrated The 16th Anniversary Of Pavitra Rishta Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.