दोन चांगल्या मित्रांचं लग्न, विशाल निकमची मात्र दांडी!, लग्नाला अनुपस्थित राहण्यामागचं अभिनेत्याने सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:00 IST2025-12-22T12:59:26+5:302025-12-22T13:00:17+5:30
Vishal Nikam : विशाल निकमने एका मुलाखतीत पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नाला अनुपस्थित राहण्यामागचं कारण सांगितलं.

दोन चांगल्या मित्रांचं लग्न, विशाल निकमची मात्र दांडी!, लग्नाला अनुपस्थित राहण्यामागचं अभिनेत्याने सांगितलं कारण
अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) आणि अभिनेता-निर्माता सोहम बांदेकर(Soham Bandekar)चा २ डिसेंबर रोजी लोणावळ्यात मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यानंतर मुंबईत त्यांच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन सोहळा पार पडला. आता लग्नानंतर पूजा येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या शूटिंग सेटवर परतली आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) मुख्य भूमिकेत आहे. त्यांचं ऑफस्क्रीन चांगलं बॉण्डिंग आहे. मात्र विशाल पूजा-सोहमच्या लग्नाला उपस्थित नव्हता. आता यामागचं कारण त्यांने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत विशाल निकमने पूजा-सोहमच्या लग्नाला अनुपस्थित राहण्यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला की, लग्नाला जाता आले नाही म्हणून मी पूजाला पर्सनली मेसेज केला होता. त्यामागचे कारण सुद्धा तसेच होते. आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे चांगले मित्र नेहमी एकमेकांची परिस्थिती समजून घेऊ शकतात. त्यांच्या लग्नाला न जाण्यामागे एक जेन्युअन कारण होतं. नाहीतर तिच्या लग्नाला जाणं माझं कर्तव्य होते कारण पूजा आणि सोहम माझे चांगले मित्र आहेत. त्या दोघांनाही मला समजून घेतलं आहे.
वर्कफ्रंट
अभिनेत्री पूजा बिरारीने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम करताना दिसते आहे. याशिवाय 'स्वाभिमान', 'साजणा' या मालिकांमध्येही ती दिसली आहे. तर सोहम बांदेकर निर्माता आहे. त्यांचं 'बांदेकर प्रोडक्शन्स' आहे.