दोन चित्रपटांचा गल्ला ८०० कोटींवर

By Admin | Updated: August 4, 2015 02:25 IST2015-08-04T02:25:25+5:302015-08-04T02:25:25+5:30

बऱ्याच कालावधीनंतर बॉलीवूडला चांगले दिवस आले आहेत. इतक्यात प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘बाहुबली’ यांनी अनुक्रमे ३०० आणि ५०० कोटींची कमाई करत

Two cinemas cast of 800 crores | दोन चित्रपटांचा गल्ला ८०० कोटींवर

दोन चित्रपटांचा गल्ला ८०० कोटींवर

बऱ्याच कालावधीनंतर बॉलीवूडला चांगले दिवस आले आहेत. इतक्यात प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘बाहुबली’ यांनी अनुक्रमे ३०० आणि ५०० कोटींची कमाई करत विक्रम केला आहे. मात्र गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या निशिकांत कामतच्या ‘दृश्यम’ चित्रपटाला मात्र सरासरी प्रतिसाद मिळाला आहे.
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘दृश्यम’ या रहस्यमय व थरारपटाने बॉक्स आॅफिसवर सरासरी यश मिळविले आहे. मूळ मल्याळी भाषेत तयार झालेला हा चित्रपट नंतर तेलगू व आता हिंदीत तयार झाला आहे. अजय देवगण असल्यामुळे प्रेक्षक ‘दृश्यम’ बघायला चित्रपटगृहांपर्यंत आले. त्यातील काही आनंदी झाले तर काही निराश. पहिल्या दिवशी त्याने ८ कोटींच्या जवळपास व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी शनिवारी ९ कोटींपेक्षा थोडा जास्त आणि त्यानंतर रविवारी त्याचा गल्ला थोडी सुधारणा करून १२ कोटींवर गेला. सारांश, पहिला आठवडा संपताना ३० कोटींची कमाई करण्यात ‘दृश्यम’ यशस्वी ठरला आहे. चित्रपट जाणकारांच्या मते या चित्रपटाच्या बजेटचा विचार केला तर पहिला आठवडा संपल्यावर त्याची झालेली ३० कोटींची कमाई काही वाईट नाही. तरीही अजय देवगणसारखा मोठा स्टार कलाकार असल्यामुळे ‘दृश्यम’ चांगली कमाई करू शकेल ही अपेक्षा होती.
चित्रपटाबद्दल चांगली बाब ही की त्याचा होणारा तोंडी प्रचार (माऊथ पब्लिसिटी) त्याला खूपच उपयोगी पडत आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार दृश्यमचा गल्ला पहिल्या आठवड्यात ५० कोटी होणे अवघड असले तरी त्याचे लक्ष्य मात्र तेवढेच आहे. बॉक्स आॅफिसवर अजूनही ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘बाहुबली’चा प्रभाव कायम आहे. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’चा गल्ला सतत वाढतोच आहे. आता त्याने ३०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेशही केला. ‘बजरंगी’ने आतापर्यंत २९२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आतापर्यंतच्या नोंदींनुसार ‘पीके’नंतरचा ‘बजरंगी’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘पीके’च्या गल्ल्याला ‘बजरंगी’ मागे टाकेल असे बोलले जात आहे. बॉक्स आॅफिसवर ‘बजरंगी’ला जोरदार टक्कर देणारा ‘बाहुबली’चा प्रभावही कमी होताना दिसत नाही. ‘बाहुबली’ने कमाईचे नवनवे विक्रम स्थापन करून ५०० कोटींचा टप्पा गाठण्यात यश मिळविले आहे. या कमाईत सगळ्या भाषांतील आवृत्त्यांचा समावेश आहे. येत्या शुक्रवारी रितेश देशमुख आणि पुलकित सम्राटच्या जोडीचा ‘बंगिस्तान’ प्रदर्शित होणार आहे. महानगरांतील युवावर्गासाठी तयार केलेल्या या चित्रपटात हिंदू व मुस्लीम ऐक्याचा विषयदेखील आहे. कॉमेडी म्हणून तयार झालेल्या ‘बंगिस्तान’ला मर्यादित यशाची अपेक्षा आहे.

Web Title: Two cinemas cast of 800 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.