'रात्रीस खेळ चाले'मध्ये ट्विस्ट? नव्या पाहुण्याचे आगमन

By Admin | Updated: September 28, 2016 11:37 IST2016-09-28T11:29:08+5:302016-09-28T11:37:55+5:30

नेहमीपेक्षा वेगळया कथानकामुळे अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

Twist in 'Night of the Game'? New arrival for new guests | 'रात्रीस खेळ चाले'मध्ये ट्विस्ट? नव्या पाहुण्याचे आगमन

'रात्रीस खेळ चाले'मध्ये ट्विस्ट? नव्या पाहुण्याचे आगमन

ऑनलाइन लोकमत

मुंबई/ सिंधुदुर्ग, दि. २८ -  नेहमीपेक्षा वेगळया कथानकामुळे अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या सेटवर 'चला हवा येऊ द्या' च्या विनोदवीरांनी भेट दिली. त्यामुळे या गंभीर वळणाच्या मालिकेच्या सेटवर काहीवेळासाठी कलाकार हास्यविनोदात रमले.

भूत, प्रेत, आत्मा, पिशाच्च या कथानकामुळे पहिल्या भागापासून ही मालिका चर्चेत आली. पण अशा घटनांमधून कोकणची बदनामी होत असल्याचा आरोप झाल्यामुळे या मालिकेचा ट्रॅक बदलण्यात आला. ट्रॅक बदलल्यानंतरही ही मालिका रंजक वळणावर असताना आता 'चला हवा येऊ द्या' च्या कलाकारांनी भेट दिली आहे.

या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या कुटुंबाभोवती एक गूढ असून, काही अदृश्य शक्तींमुळे ब-याचवर्षांपासून या कुटुंबात कुठलेही मंगल कार्य झाले नसल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

Web Title: Twist in 'Night of the Game'? New arrival for new guests