सुशांतच्या मृत्यूमागे एक खान? जेव्हा ट्विंकल खन्नाला ड्रायव्हरने सांगितलं 'सत्य', अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:05 AM2024-04-23T10:05:38+5:302024-04-23T10:06:11+5:30

नुकतंच ट्विंकल खन्नाने तिच्या एका कॉलममध्ये सुशांतच्या मृत्यूचा उल्लेख केला.

Twinkle Khanna opens up on fake news spreading on whatsapp youtube gave sushant singh rajput case example | सुशांतच्या मृत्यूमागे एक खान? जेव्हा ट्विंकल खन्नाला ड्रायव्हरने सांगितलं 'सत्य', अभिनेत्री म्हणाली...

सुशांतच्या मृत्यूमागे एक खान? जेव्हा ट्विंकल खन्नाला ड्रायव्हरने सांगितलं 'सत्य', अभिनेत्री म्हणाली...

सुशांतसिंह राजपूत (Sushant singh Rajput) ज्याची आठवण काढली की आजही चाहते भावूक होता. प्रभावशाली अभिनेत्यांपैकी तो एक होता. २०२० साली संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त असताना सुशांतने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तो ड्रग्सच्या आहारी गेला होता असंही पुढे तपासात उघड झालं. पण सुशांतची हत्या झाली, त्याला ड्रग्स दिले गेले असे अनेक खुलासे होऊ लागले जे पुढे सिद्ध झालेच नाहीत. नुकतंच ट्विंकल खन्नाने (Twinkle Khanna) तिच्या एका कॉलममध्ये सुशांतच्या मृत्यूचा उल्लेख केला. काय म्हणाली अभिनेत्री?

ट्विंकल खन्नाने टाईम्स ऑफ इंडियामधील तिच्या कॉलममध्ये लिहिले, "आपण आधीपासूनच खोट्या बातम्यांची सीरिज पाहिली आहे. एडिट केलेले फोटो जसं की कुस्तीपटूंच्या आंदोलनात विनेश फोगाटचा हसतानाचा फोटो व्हायरल झाला. इथपासून ते कोरोना व्हायरस पसरायचं मूळ कारण सुद्धा लोकांनी शोधून काढलं. चुकीच्या बातम्यांमुळे कित्येक लोक प्रभावित होतात याची आपण कल्पनाही करु शकत नाही."

ती पुढे म्हणाली, "चेन्नईत असताना एका कॅब ड्रायव्हरसोबत गप्पा मारल्या. तो मला सांगत होता की सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूमागे तीनही खानचा हात आहे. त्याने हे व्हॉट्सअॅप आणि युट्यूबवर पाहिलं असं तो म्हणाला. हे खरं सत्य आहे यावर त्याला विश्वास होता. तेव्हा मी त्याला विचारलं की भाईसाहाब तुम्हाला अशा कल्पना येतात कुठून? मग तो थोडा सावध झाला आणि म्हणाला, 'मॅडम, तुम्ही बरोबर बोलत आहात, सुशांतच्या हत्येसाठी तीन नाही एकच खान जबाबदार आहे."

ट्विंकल गंमतीत म्हणाली, "बघा आधी आपल्याला योग्य माहिती मिळत नव्हती. नक्की काय सुरुए आपल्याला कळायचंच नाही. नंतर आपल्याकडे रेडिओ आला. मग टीव्ही आला तरी फारसं काही खास  माहित पडायचं नाही. आता आपल्याला 'खरं सत्य' व्हॉट्सअॅप आणि युट्यूबवरुन समजत आहे. आता आपल्यापासून काहीच लपून राहू शकत नाही."

Web Title: Twinkle Khanna opens up on fake news spreading on whatsapp youtube gave sushant singh rajput case example

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.